google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजन

प्रवरासंगम परिसरात ‘नागेबाबा’ दिनदर्शिकेचे स्वागत 

दिनदर्शिका 2023 चे वितरण 

                            स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यातील प्रवरासंगम येथे नागेबाबा मल्टीस्टेट दिनदर्शिका 2023 चे प्रवरासंगम परिसरातील टोका, माळेवाडी, मंगळापुर व खेडले काजळी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
               
           याप्रसंगी कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे म्हणाले की नागेबाबा मल्टीस्टेट ही एक उत्कृष्ट सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. आर्थिक आधार देऊन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांच्या अन्नपूर्णा सारख्या विविध उपक्रमांचे स्वागत करीत आहोत. नुकताच या संस्थेला वर्ल्ड अवॉर्ड मिळाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन कडूभाऊ काळे यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत झाला. याप्रसंगी प्रवरासंगम शाखेचे मॅनेजर सुभाष पठारे यांनी उपस्थितांचे स्वागत करून नववर्षाची दिनदर्शिका सस्नेह भेट देऊन आभार मानले. वर्ष सुरू होण्यापूर्वीच नवीन हातात पडल्यामुळे अनेकांनी आभार व्यक्त केले.
         
          याप्रसंगी अर्थतज्ञ राजेंद्र सुडके, चेअरमन पांडुरंग काळे, कृषी अधिकारी रमेश धर्माधिकारी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पांडव, सुनील कुमावत, गणेश जागीरवार कैलास कपिले, किशोर गोरे, अनिल काळे व मान्यवर उपस्थित होते. दिनदर्शिका वितरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंदना साळवे, योगेश भागवत, प्रवीण जाधव, सिद्धार्थ वाघ, स्वामिनी भिंगारदे, कृष्णा कोरडे, रवींद्र जाधव यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!