google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

नेवासा शहरातील वेश्याव्यवसाय चालणाऱ्या हॉटेलवर छापा

हॉटेल कुलस्वामिनी, हॉटेल विलास व हॉटेल प्रवरावर छापा; सात पीडित महिलांची सुटका व तीन आरोपी ताब्यात; पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई

                             स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना नेवासा शहरात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात असल्याबाबत गुप्त बातमी मिळाली. त्यावरून नेवासा शहरातील हॉटेल कुलस्वामिनी, हॉटेल विलास व हॉटेल प्रवरा या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन सात पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. 
  
         पीडित महिलांसोबत आढळून आलेले आरोपी मच्छिंद्र ज्ञानदेव कुटे, गणेश रामचंद्र चव्हाण, रामदास नामदेव काळे (सर्व रा.नेवासा) यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन येथे महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
            एकाच वेळी तीन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आला. या कारवाईमुळे नेवासा  परिसरातील व शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. या छाप्यामध्ये कुलस्वामिनी लॉज 4, विलास लॉज 2 व प्रवरा लॉज 1 अशा एकूण सात महिला मिळून आल्या
          सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र आरोळे, पोलीस नाईक प्रशांत ननावरे, बबन तमनर, बाळासाहेब  नागरगोजे, म पो.ना. सविता उंदरे, पोकाॅ आसाराम  बटुळे, पोकाॅ शाम गुंजाळ, मपोकाॅ  शिरसाठ, मपोकाॅ सुषमा जाधव यांनी केली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!