google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवासा फाटा कोयता हल्ल्याप्रकरणी दोघे अटकेत

पोलिसांनी काढली आरोपींची वरात

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : नेवासा फाट्यावर मागील किरकोळ भांडणावरून राग व्यक्त करत चार जणांनी एका युवकावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवार (दि. 3) रोजी घडली. यातील दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले असून अटक केल्यानंतर पोलिसांनी नेवासा फाटा परिसरातून त्यांची वरात काढली.
               नेवासा पोलीस स्टेशन येथे फिर्यादी साईल आसाराम खाजेकर वय 19 व्यवसाय-मजुरी चितेगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर मूळ रा. डाक बंगलाजवळ नेवासा खुर्द जिल्हा नेवासा जिल्हा अहिल्यानगर याने जबाब दिला की, माझे आजी आजोबा नेवासा खुर्द ता. नेवासा येथे राहण्यास आहेत. मी त्यांचेकडे नेहमी येत जात असतो. 
             शुक्रवार (दि. 3) रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मी माझे मित्र गौरव साळवे व रेहान शेख याचे सोबत पान खाण्यासाठी नेवासा फाटा येथे सिद्धेश्वर पान स्टॉल येथे गेलो होतो. काही वेळानंतर तेथे एका कार क्रमांक MH 46 AV 4849 मधुन संदेश संजय गायकवाड, सोमनाथ सुरेश चांदणे, रोहित अंकुश बर्डे व रविंद्र बाळासाहेब शिंदे सर्व रा. नेवासा बुद्रुक ता. नेवासा जि. अहिल्यानगर असे चारही जण त्यांचे हातात लोखंडी कोयते घेवुन माझे जवळ आले. यातील संदेश गायकवाड मला म्हणाला कि मागील भांडणाच्या वेळी तुला सांगितले होते तू नेवाशात दिसु नको. तरी देखील तू परत का आला मी त्याला समजावुन सांगण्याचा प्रयत्न करत असताना संदेश गायकवाड याने त्याच्या सोबत आलेल्या मिंत्राकडे पाहुन म्हणाला की हा आज आपल्या तावडीत सापडला आहे. आज याचा मर्डरच करु. याला आज जिवंत सोडायचे नाही असे म्हणुन संदेश गायकवाड याने त्याचे हातातील कोयत्याने मला जीवे ठार मारण्याचे उद्देशाने माझ्या गळ्यावर वार केला असता मी वार वाचविण्यासाठी माझा हातमध्ये घातल्याने माझ्या हाताला वार लागुन गंभीर जखमी झालो. तेथुन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना सोमनाथ चांदणे व रविंद्र शिंदे या दोघांनी त्यांचे हातातील कोयत्याने मागे पाठीवर वार करुन गंभीर जखमी केले. त्या सर्वांनी मला खाली पाडुन लाथाबुक्क्याने मारहाण केली. रोहित बर्डे याने माझ्या छातीवर जोरात लाथाने मारहाण केली. मला वाचविण्यासाठी माझे मित्र व जमलेल्या लोकांना मी मदतीसाठी बोलवले असता संदेश गायकवाड त्यांना कोयता दाखवुन म्हणाला की आज आम्ही याचा मर्डर करणार आहे. जो आमच्यामध्ये येईल त्याचाही आम्ही मर्डर करु अशी धमकी दिल्याने जमलेले लोक घाबरुन मदतीला आले नाही. तेथील व्यापाऱ्यांनी दहशतीपोटी त्यांची दुकाने बंद करुन पळापळ केली. 
          घटना घडल्यानंतर त्वरित पोलीस आल्याने संदेश गायकवाड व त्याचे मित्र तेथुन पळुन गेले. त्यानंतर जमलेल्या लोकांनी मला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे. म्हणुन माझी संदेश संजय गायकवाड, सोमनाथ सुरेश चांदणे, रोहित अंकुश बर्डे व रविंद्र बाळासाहेब शिंदे सर्व रा. नेवासा बुद्रुक ता. नेवासा जि. अहिल्यानगर यांनी त्यांचे हातातील कोयत्याने जीवे ठार मारण्याचे उद्देशाने माझ्या हातावर पाठीवर वार करुन गंभीर जखमी केले.
       
             यावेळी नेवासा पोलिसांनी तत्परतेने दोन आरोपींना अटक करून त्यांची नेवासा फाटा परिसरातून वरात काढली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील व पोलीस पथक उपस्थित होते.
         नेवासा पोलिसांनी सदर आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 109, 115 (2), 152, 3(5), शस्त्र अधिनियम 4, 25, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नसार 37(1) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!