google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

‘पोक्सो’तील आरोपी गावठी कट्यासह जेरबंद

नेवासा पोलिसांची कारवाई; 'ऑपरेशन ऑल आऊट' चे यश

                                     स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी राबवल्या जात असलेल्या ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत नेवासा पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये एका पोक्सो गुन्ह्यातील फरार आरोपीचा तांत्रिक छडा लावत पोलिसांनी त्याला गावठी कट्टा (पिस्तुल) आणि ४ जिवंत काडतुसांसह रंगेहात अटक केली आहे. आदिनाथ गोरख ढगे (वय २६ वर्ष रा. खेडले काजळी ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
              सदरची कारवाई दि. १० जून रोजीच्या ऑल आऊट ऑपरेशन मोहिमे अंतर्गत पोलीस पथक फरार व पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध मोहिम सुरु होती. या दरम्यान नेवासा ठाण्यातील गु.र.नं. ३०९/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ७८, ३५२ सह पोक्सो कलम ८, १२ प्रमाणे मधील फरार आरोपी आदिनाथ गोरख ढगे याचा नेवासा पोलीस ठाणे हद्दीत शोध सुरु होता.
               आरोपीबाबत तांत्रिक विश्लेषण करत तो सोनई ता. नेवासा येथे असल्याचे खात्रीशीर माहिती समजताच पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील व पथक यांना तात्काळ सोनई येथे रवाना केले. सोनई येथे आरोपीस पोलिसांची चाहुल लागताच त्याने पळुन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने शिताफीने पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. सदर आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला बेकायदेशीररित्या बाळगलेला गावठी कट्टा मॅगझीन लोड केलेले ०४ जिवंत राऊंडसह मिळून आला.
            आरोपीकडे सदर अग्निशस्त्राबाबत कोणताही परवाना नसल्याने त्याच्याविरुध्द नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४९८/२०२६ शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
                  सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नारायण डमाळे, पोलीस कॉन्स्टेबल सुमित करंजकर, पोलीस कॉन्स्टेबल अतुल शेळके आणि पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर गहाळ यांच्या पथकाने केली आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!