google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नगर येथे ४३० खाटांच्या शासकीय रुग्णालयासाठी ९८१ पदनिर्मितीस शासनाची मान्यता

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार; आरोग्यसेवेचा आणि त्या अनुषंगाने स्थानिक रोजगार संधीचा विस्तार

                                    स्वराज न्यूज नेटवर्क 
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न ४३० खाटांच्या रुग्णालयासाठी आवश्यक पदनिर्मितीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्या अन्वये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला असून रुग्णालयाच्या कार्यक्षम संचालनासाठी एकूण ९८१ पदांची निर्मिती टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. विधान परिषद सभापती मा प्रा राम शिंदे यांनी यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.
                  राज्यातील निमशहरी, ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे तसेच वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढविणे या उद्देशाने राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथे १०० विद्यार्थी प्रवेशक्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.
            शासन निर्णयानुसार रुग्णालयासाठी नियमित स्वरूपातील गट-अ, गट-ब व गट-क मधील ५१५ पदे तसेच बाह्यस्त्रोताद्वारे (आउटसोर्सिंग) ४६६ मनुष्यबळ सेवा अशा एकूण ९८१ पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. ही पदे चार टप्प्यांत भरली जाणार असून पहिल्या टप्प्यातील पदनिर्मिती तत्काळ करण्यात येणार आहे.
              या पदनिर्मितीमुळे वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता, लिपिक, वाहनचालक तसेच विविध सहाय्यक व तांत्रिक पदांसह अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. रुग्णालयाच्या सर्व विभागांचे सक्षम मनुष्यबळ उभारून नागरिकांना अधिक प्रभावी व दर्जेदार आरोग्यसेवा देण्यास मदत होणार आहे.
            अहिल्यानगर जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात असून वैद्यकीय शिक्षण, आरोग्यसेवा आणि स्थानिक रोजगारनिर्मितिच्या संधी यांना यामुळे मोठी चालना मिळणार आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!