google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

चिमुकल्यांचा भक्तिमय ‘दिंडी सोहळा’ उत्साहात संपन्न

ताकेवस्ती जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग; विठ्ठल नामाच्या गजराने गाव झाले विठ्ठलमय

                                       स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : ‘जय जय राम कृष्ण हरी’ आणि ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या अखंड जयघोषात, हाती टाळ-मृदंग आणि खांद्यावर भगव्या पताका घेतलेल्या चिमुकल्या वारकऱ्यांच्या सहभागामुळे तालुक्यातील ताकेवस्ती शनिवारी विठ्ठलभक्तीने दुमदुमून गेली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ताकेवस्ती येथे आयोजित करण्यात आलेला भव्य दिंडी सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
                 सकाळी ८ वाजता शाळेच्या प्रांगणात विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करून दिंडीला प्रारंभ करण्यात आला. पारंपरिक वारकरी वेशभूषेत सजलेले विद्यार्थी, डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनी, टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करीत गावातून मार्गक्रमण करत होते. गावातील भजनी मंडळ व ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहाने दिंडीत सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
                   या दिंडी सोहळ्यासाठी शिक्षक दांपत्य प्रदीप उकांडे व शिक्षिका सुमती चौरे यांनी विशेष नियोजन केले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश ताके तसेच ताकेवस्ती माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष गणेश ताके पाटील यांनीही आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
               यावेळी शरद ताके, देवदास ताके सर, गणेश ताके, भारत ताके, सुरेश ताके, ज्ञानेश्वर ताके, ज्ञानेश्वर तुपे, हरीभाऊ ताके, भाऊसाहेब बागडे, अमोल ताके यांच्यासह महिला भगिनी, भजनी मंडळाचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
              शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरा, संस्कार आणि भक्तीभाव रुजविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. चिमुकल्यांच्या या आगळ्यावेगळ्या दिंडी सोहळ्याचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!