google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवासा पोलिसांची अवैध वाळूवर कारवाई

दोन लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त; डंपरसह आरोपी ताब्यात

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 

नेवासा : नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील ज्ञानेश्वर मंदिराच्या पाठीमागील परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर नेवासा पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एक डंपर आणि दोन ब्रास वाळूसह एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

           पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांना मंगळवार (दि. ९) रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ज्ञानेश्वर मंदिराच्या पाठीमागील भागात अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू आहे. या माहितीची दखल घेत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील यांच्यासह विशेष पथकाला तत्काळ कारवाईचे आदेश दिले.

               पथकाने घटनास्थळी जाऊन खात्री केली असता एक लाल-पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा विनानंबर डंपर व दोन ब्रास वाळूसह गोविंद बबन मोरे (वय ४०, रा. हंडीनिमगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) हा इसम आढळून आला. पोलिसांनी सुमारे २ लाख ५० हजार रुपये किंमतीचा डंपर आणि १० हजार रुपये किंमतीची वाळू असा एकूण २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

             या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनिल सर्जेराव गंगावणे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक सागर ढिकले, पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील तसेच अजय साठे, सुनिल गंगावणे, नारायण डमाळे, सुमित करंजकर, अतुल शेळके आणि परमेश्वर गहाळ यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सहाय्यक फौजदार गणेश नागरगोजे हे करीत आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!