google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

नेवाशातील कामिनशहावली दर्गा परिसर प्रतिबंधित क्षेत्र

शनिवार रात्रीपासून ते रविवार रात्रीपर्यंत आदेश निर्गमित; उपविभागीय दंडाधिकारी, अहिल्यानगर यांचे आदेश पारित

                                      स्वराज न्यूज नेटवर्क 

नेवासा : शहरामध्ये रामनवमीनिमित्त मोठी मिरवणुक असते. सन 2022 साली मिरवणुक दरम्यान हिरव्या रंगाचा ध्वज फडकवल्याने भावना भडकल्याने दंगल होवुन गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घेत प्रशासनाने कामिनशहावली दर्गा या धार्मिक स्थळाबाबत वरीलप्रमाणे कायदा व सुव्यवस्थाबाबत खबरदारी घेत दर्गा परिसर 100 मीटर हे क्षेत्र भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (2023) चे कलम 163 प्रतिबंधीत क्षेत्र  म्हणून उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी या संबंधीचे आदेश पारित केले आहेत.

           या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या पत्रात म्हटले आहे की, कामिनशहावली दर्गा या धार्मिक स्थळाबाबत वरीलप्रमाणे कायदा व सुव्यवस्थाबाबत पार्श्वभुमी पाहता तसेच सद्य स्थितीमध्ये देशांमध्ये चालु असलेला धार्मिक मुददा या सर्व बाबीचा विचार करता आगामी रामनवमी उत्सवादरम्यान मिरवणुकीतील सहभागी अतिउत्साही तरुण दर्गा परिसरात जाण्याची दाट शक्यता वाटते. त्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होवुन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवुन सामाजिक व जातीय शांतता बाधीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
       100 मीटर परिसरामध्ये राहत असलेले नागरीक यांना व पुजा अर्चा करणारे व्यक्ती वगळुन हा आदेश पारीत करण्यात आला आहे. तसेच स्थानिक नागरीकांनी या कालावधीत शासकीय ओळखपत्रे सोबत बाळगण्यात यावी. याकामी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (2023) चे कलम 163 अन्वये आदेश निर्गमित केले आहे. त्यानुषंगाने नेवासा तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात शनिवार दिनांक 5 एप्रिल 00.01 ते व 6 एप्रिल रोजी 23.59 वाजेपर्यंत नेवासा शहरामध्ये रामनवमीनिमित्त मोठी मिरवणुक निघत असतात. तसेच सन 2022 साली रामनवमीच्या मिरवणुक दरम्यान हिरव्या रंगाचा ध्वज फडकवल्याने भावना भडकल्याने दंगल होवुन गुन्हा नोंदविण्यात आलेले आहेत. तरी दिनांक 05 एप्रिल रोजी 00.01 ते दिनांक 06 एप्रिल रोजी 23.59 वा. पर्यत सदर क्षेत्रात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (2023) चे कलम 163 अन्वये प्रतिबंधित क्षेत्र म्हणून आदेश निर्गमित  करण्यात आले आहेत.
     जारी केलेल्या आदेशात ते म्हणतात की, नेवासा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये मौजे नेवासा येथे कामिनशहावली दर्गाच्या मालकीच्या जागेवर काही नागरीकांनी अतिक्रमण केले असुन त्यामध्ये काही हिंदू व मुस्लीम समाजाचे वास्तव्य आहे. सदर अतिक्रमण काढणेबाबतचा दावा ट्रस्टीचे वतीने औरंगाबाद वक्फ बोर्डात सन 2016 मध्ये दाखल केला असुन तो सध्या न्यायप्रविष्ठ आहे. सदर अतिक्रमणाबाबत देखील हिंदु व मुस्लीम समाजास सदर मालकी हक्कावरुन असंतोष आहे. उपलब्ध गोपनीय अभिलेखानुसार हिंदु समाजाचे असे म्हणणे आहे की, सदर दर्गा ही कामिनशहावली दर्गा नसुन ते कानिफनाथ महाराज यांचे मंदिर आहे. आमचे पुर्वज पुर्वी श्रावण महिन्यामध्ये दर गुरुवारी कावडीने पाणी घालत होते. तर मुस्लीम समाजाचे असे म्हणणे आहे की, सदर वास्तु ही देवस्थान नसुन ते कामिनशहावली दर्गा आहे. सदर दर्गा ही 1952 मध्ये ट्रस्ट झाली असुन सदर दर्गाची एकुण 300 बाय 200 एवढे क्षेत्र आहे तशी सिटी सर्वेला नोंद देखील आहे. 
              सदर दर्गाचा इतिहास हा 700 वर्षापुर्वीचा आहे. पोलीस ठाण्यातील उपलब्ध रेकॉर्डनुसार दिनांक 04/05/1986 साली कामिनशहावली दर्गाचा उरुस कार्यक्रम दरम्यान शिवसेना शाखा नेवासा यांनी भगव्या रंगाची चादर नेण्याचे ठरविल्याने त्यावरुन नेवासा शहरामध्ये हिंदु व मुस्लीम समाजामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.. तसेच दिनांक 09/05/1986 रोजी कामिनशहावली दर्गावर कोणीतरी अज्ञात इसमाने भगवा झेंडा लावल्याने व तेथील मुळ हिरवा झेंडा फाडुन नुकसान केल्याने नेवासा पोस्टे गुरनं. 96/86 भादंविक 295 (अ) प्रमाणे दाखल झाल्याने सदर घटनेने गावामध्ये तणाव निर्माण झाला होता. सन 1986 साली नेवासा खुर्द येथील अॅड.एम.आय. पठाण यांचे अध्यक्षतेखाली मिटिंग घेवुन कामिनशहावली दर्ग्यास कुलुप लावण्याचे ठरविले. कुलुप लावण्याचे व पुजा अर्चा करण्याचे काम शेख अब्दुल नबी अब्दुल करीम यांचेकडे सोपवण्यात आले होते. सदर कुलुप लावल्याने हिंदु समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण होवुन तणावपूर्ण वातावरण झाले होते. 
            हिंदु समाजाचे असे म्हणणे होते की. सदर कामिनशहावली दर्गा हा दर्गा नसुन पुर्वी कानिफनाथाचे मंदिर होते व सदर दर्गावर हिंदु समाजाचा ही हक्क आहे. यादरम्यान दिनांक 08/06/1986 ते दिनांक 09/06/1986 रोजीचे दरम्यान कामिनशहा दर्यास लावलेले कुलुप कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेले. सदर बाबत नेवासा पोस्टे गुरनं. 118/86 भादंवि 379 प्रमाणे दाखल आहे. तसेच सन 1987 साली देखील नेवासा शहरातील काही हिंदु तरुणांनी सदर मंदिर दर्गामध्ये प्रवेश करुन आतमध्ये खोदण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरुन मोठ्या प्रमाणात हिंदु मुस्लीम जातीय तणाव निर्माण झाला होता. यापुर्वी नेवासा शहराला हिंदु मुस्लीम जातीय दंगलीची पार्श्वभुमी असुन सन 1987, सन 2001, सन 2011, सन 2022 मध्ये जातीय तणाव निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
           उक्त प्रमाणे नमुद केलेल्या परिसरामध्ये संबंधित सक्षम अधिकारी यांनी प्राधिकृत केलेले व्यक्ती, पोलीस निरीक्षक, नेवासा पोलीस स्टेशन यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी/कर्मचारी तसेच सध्या 100 मीटर परिसरामध्ये रहात असलेले नागरीक व पुजा अर्चा करणारे व्यक्ती यांचेशिवाय इतर व्यक्तीना तसेच वाहनांना अथवा पायी अथवा इतर रितीने फिरण्यास, उभे राहण्यास अथवा समवेत चालण्यास प्रतिबंधित करण्यात येत आहे. तसेच पोलीस निरीक्षक, नेवासा पोलीस स्टेशन यांनी सदर क्षेत्रातील 100 मीटर परिसरातील स्थानिक नागरिकांना या कालावधीत शासकीय ओळखपत्रे दयावीत. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेत यावी. असे आदेशात नमूद केले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!