google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवाशाची ‘सोनेरी टोळी’ गजाआड

स्वस्तामध्ये सोने देण्याचे आमिष; नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; आरोपींकडून सहा लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त

                                     स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी अरविंद हलसांगी रा. वाघोली, जि.पुणे यांना दिनांक २५ फेब्रुवारी रोजी दुपारी शेखर उर्फ बंटी संजय पाडळे रा. देवगाव ता. नेवासा याने फिर्यादीचा विश्वास संपादन करुन किरण काळे रा. नेवासा तसेच ८ ते १० इसम यांनी संगनमत करुन स्वस्तात सोने देतो असे सांगुन नेवासा येथे नेवासाकडुन श्रीरामपुरकडे जाणारे रोडवर हॉटेल शिवमजवळ कच्या रस्त्याने उजव्या बाजुला कांद्याचे चाळीमध्ये बोलावुन घेवुन माझे मित्र आदित्य नागटिळे व अशोक शहाणे व मला काठीने व लाथाबुक्याने मारहाण करुन काठी व धारदार शस्त्राचा व पिस्तुलचा धाक दाखवुन रोख रक्कम अॅपल कंपनीचा मोबाईल, मित्रांचे २ विवो मोबाईल, सोन्याच्या अंगठ्या असे एकुण १५,६५,०००/-रु कि.ची मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला होता. सदर घटनेबाबत नेवासा पोलीस ठाणे गु.र.नं. १६३/२०२६ भारतीय न्याय संहिता 1/2 क ३१० (२), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
       नगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे हरिष भोये पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, दिपक घाटकर, फुरकान शेख, बिरप्पा करमल, बाळासाहेब नागरगोजे, भिमराज खर्से, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांचे पथक तयार करुन सदर पथकास दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी तात्काळ ताब्यात घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले.
           वर नमुद पथकाने दरोड्याचे गुन्ह्यामधील आरोपींची माहिती संकलित करुन व्यवसायिक कौशल्याचे आधारे माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा शेखर उर्फ बंटी संजय पाडळे रा. देवगाव ता. नेवासा त्याचे इतर साथीदाराने केला असुन तो नेवासा, माळी चिंचोरा फाटा परिसरात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ नेवासा ते छत्रपती संभाजीनगर जाणारे रोडवर माळी चिंचोरा फाटा परिसरामध्ये सापळा रचला असता पथकास सदर परिसरात दोन इसम संशयितरित्या फिरतांना दिसुन आले. तेव्हा पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे शेखर उर्फ बंटी संजय पाडळे वय ३२ वर्षे रा. देवगाव ता. नेवासा, जि. अहिल्यानगर, किरण बंडु काळे वय २९ वर्षे रा. नागफनीवस्ती नेवासा ता. नेवासा जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. ताब्यातील शेखर उर्फ बंडी संजय पाडळे यास पोलिसी खाक्या दाखविला असता त्याने सदर गुन्हा हा त्यांचे साथीदार भाऊसाहेब छगन भोसले रा. नेवासा फाटा, ता. नेवासा, सचिन उर्फ गटण्या पवार रा. खळवाडी, नेवासा खु ।। ता. नेवासा व त्याचे ८ ते ९ अनोळखी साथीदार यांचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली.
          आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्याचे वेळी वापरलेला ३५,०००/- रुपये किमतीची एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे, ३०,०००/-रु कि.चा एक मोबाईल, ६,००,०००/- रु रोख रक्कम असा एकुण ६,६५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
        आरोपी किरण बंडु काळे याच्याविरुध्द यापुर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस स्टेशन येथे तीन गुन्हे, राहाता पोलीस स्टेशन येथे तीन गुन्हे, कोपरगाव पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे, एमआयडीसी येथे एक गुन्हा तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे एक असे दहा गुन्हे दाखल आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!