google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

‘श्रीशिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक महामंडळ’ नामांतर करा

शिंदे यांची मागणी

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने भटक्या विमुक्त जाती-जमातीतील नाथपंथी समाजासाठी ‘वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती आर्थिक विकास महामंडळ’ अंतर्गत उपकंपनी म्हणून स्थापन करण्यात आलेल्या महामंडळाला’ श्री शिवगोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक महामंडळ’ असे नामांतर करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज अहिल्यानगरचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब शिंदे यांनी समाजाचे प्रांताध्यक्ष, व सेवानिवृत्त पोलीस उप-अधीक्षक मच्छिंद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
            अखिल नाथपंथी डवरी गोसावी, नाथजोगी, नाथबाबा, गोंधळी, बहरूपी, भारूडी या भिक्षुक, भटक्या जाती-जमातीच्या राज्यभरातील समाजबांधवांनी पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे राज्यस्तरीय बैठक घेऊन महामंडळाचे नामांतर करण्याचा ठराव मंजूर केला. मच्छिंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला निवृत्त महसूल उपायुक्त आनंदराव जगताप, महादेव शिंदे, डॉ. जयाजी नाथ साहेब, नारायण शिंदे, भालचंद्र सावंत, अंबरनाथ इंगोले, डॉ. सुभाष भोसले, सुमित लगस, मोहन शिंदे, बाबा शिंदे, संजय सावंत, संजय जगताप, अशोक शिंदे, अविनाश शिंदे, दयानंद सावंत, गणेश लगस, अनिल चव्हाण, सहदेव सावंत, ऍड. नवनाथ शिंदे यांच्यासह मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग या राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने नाथपंथी समाजबांधव उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ घोषित केले. याचे स्वागत आम्ही करतो. -मच्छिंद्र चव्हाण
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!