google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दहावीच्या निकालाचे सलग 22 वे वर्ष

सेंट मेरीज् स्कूलची ऐतिहासिक कामगिरी; शर्वरी रासने शाळेत प्रथम, 124 विद्यार्थ्यांचे सुयश

                                     स्वराज न्यूज नेटवर्क

नेवासा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षेचे निकाल आज घोषित झाले. या परीक्षेत सेंट मेरीज् शाळेतील 124 विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा सलग 22व्या वर्षीही कायम ठेवली. 
शर्वरी रासने – प्रथम
       शाळेतून कु. शर्वरी योगेश रासने 96.80 टक्के गुण प्राप्त करून प्रथम, कु. कविन रोहित सचदे 96.60 टक्के गुण प्राप्त करून द्वितीय, तर कु. श्रावणी बाबासाहेब शेळके 95.80 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक घेत शाळेचे नाव उज्वल केले.
कविन सचदे -द्वितीय
      विद्यालयातून यावर्षी एकूण 124 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यापैकी 75 टक्के व त्यापेक्षा अधिक टक्के प्राप्त झालेले विद्यार्थी एकूण 93 आहेत तर प्रथम श्रेणी 60 टक्के व त्यापेक्षा अधिक टक्के मिळविलेले  एकूण 31 विद्यार्थी आहेत.
श्रावणी शेळके – तृतीय
       या विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जोसी, व्यवस्थापिका सिस्टर मारिया, सिस्टर लिसा, सिस्टर मुक्ता, शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
           या सर्व विद्यार्थ्यांना विजय लोंढे, संदीप सरोदे, सकिना शेख, रमेश निमसे, विकास बोर्डे, स्वाती पाटील, तृप्ती वाघ, प्रशांत गायकवाड, सोनाली काळाणे, मुबिना शेख, वैशाली ससाणे, मीनाक्षी घुले, विष्णू खांदोडे, पापा शेख या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!