google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नोकरी

पोपटराव पाटील संस्थेचे वतीने सत्कार समारंभ

विविध पदांवर झालेल्या निवडीबद्दल सन्मान; पानेगांव येथील पोपटराव पाटील संस्था

                                   स्वराज न्यूज नेटवर्क 
पानेगांव : नेवासा तालुक्यातील पानेगांव येथील पोपटराव पाटील संस्थेच्या वतीने विविध पदांवर नेमणूक झालेल्या पदाधिकाऱ्यांचा संस्थेचा सभागृहात सत्कार समारंभ संपन्न झाला. अध्यक्षस्थानी पानेगांव विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष जालिंदर जंगले हे होते.
           दोन जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्त भिकाजी जंगले, पानेगांवचे भाचे खुपटी येथील राहुल प्रकाश चौधरी यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल, मुळा एज्युकेशन संस्थेत अविरत ज्ञानदानाचे कार्य करुन सेवा निवृत्त झालेले शिक्षक शिवाजी राजाराम जंगले, तसेच बिनविरोध पार पडलेल्या पोपटराव पाटील संस्थेत नुकतीच स्विकृत संचालक पदी निवड करण्यात आली. यामध्ये दोन जणांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये गणेश चिंधे, गिताराम जंगले संस्थेचे संस्थापक संजय जंगले यांनी सांगितले. यावेळी पदाधिकाऱ्यांचा संस्थेचा सभागृहात सत्कार आयोजन करण्यात आले.
           कार्यक्रमासाठी मुळाचे संचालक संजय जंगले, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय घोलप, ज्ञानेश्वर संस्थान विश्वस्त कैलास जाधव, मुळा बॅंकेचे संचालक रमेश जंगले, पोपटराव पाटील संस्थेचे उपाध्यक्ष दादासाहेब काकडे, पानेगांव संस्थेचे संचालक जालिंदर जगन्नाथ जंगले, कचरु जंगले, रमेश गुडधे, निवृत्ती जंगले, मा. सरपंच रघूनाथ जंगले, हभप गुडधे महाराज, बाळासाहेब जंगले, भारत जंगले, मोहनराव जंगले, पानेगांव संस्थेचे सचिव शिवाजी जंगले, सहसचिव बबनराव जंगले, बाबासाहेब शेंडगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकनियुक्त सरपंच संजय जंगले यांनी केले. सुत्रसंचालन बाळासाहेब नवगिरे यांनी तर आभार पोपटराव पाटील संस्थेचे सचिव भाऊसाहेब बोर्डे यांनी मानले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!