google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

‘सेंट मेरीज’ प्रांगणात ’ग्रॅज्युएशन डे’ संपन्न

'अर्सलाइन किंडर गार्टन'चा उपक्रम; विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक शिक्षणाची पदवी प्रदान; चिमुकल्यांनी सादर केले रंगारंग कार्यक्रम

                                      स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा – तालुक्यातील अहिल्यानगर येथील अर्सलाइन किंडर गार्टन या शिशुवर्ग शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांचे पूर्व प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्याबद्दल नुकतीच पदवी प्रदान करण्यात आली. शनिवार सायंकाळी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून रंगतदार सादरीकरणेही झाली. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना गीताने करण्यात आली. कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोकराव ढगे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच नेवासा येथील ज्ञान माऊली चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर दिलीप जाधव आणि सहाय्यक धर्मगुरू फादर अक्षय आढाव हे उपस्थित होते.
                 माजी कुलगुरू डॉ. अशोकराव ढगे यांनी आपल्या भाषणात जागतिक स्पर्धेत नव्या युगातील शिक्षण हे दर्जेदार, चांगले संस्कार आणि कौशल्यपूर्ण असावे याविषयी आपले मत व्यक्त केले. मुख्याध्यापिका सिस्टर जोसी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषण कौशल्यासह रंगारंग कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पदवीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे नृत्य आकर्षणाचे केंद्र होते.
             कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिस्टर मारिया, सिस्टर लिसा, सिस्टर मुक्ता व शिशु वर्ग शिक्षिका सुजाता भालेराव, प्रतिभा साळवे, उज्ज्वला आगळे, मीनल ठोंबरे, ऋतुजा इंगळे, पल्लवी कांबळे, मेघा शिंदे, सुशीला थोरात, श्वेता मोरे, संगीता पंडित यांनी परिश्रम घेतले. त्याच बरोबर विजय लोंढे, संदीप सरोदे, विष्णु खांदोडे, प्रशांत गायकवाड, सुरेश लव्हाटे, पापा शेख, सकिना शेख, योगिनी बनगर, शबाना शेख, स्वाती पाटील, सोनाली काळाणे, तृप्ती वाघ, अनिता मारकळी, सना कौसर शेख, रेश्मा लोखंडे, वैशाली ससाणे व मीनाक्षी कोल्हे आदींनी प्रयत्न केले. शाळेच्या शिक्षिका एस्तर गाडे व वैशाली साळवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुजाता भालेराव यांनी आभार प्रकट केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!