google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

अखेर नेवाशात अतिक्रमणावर हातोडा

व्यावसायिकांमध्ये चिंतेचे सावट

                                      स्वराज न्यूज नेटवर्क 

नेवासा : शहरातील अतिक्रमण प्रचंड बंदोबस्तात आज उध्वस्त करण्यात आले. नेवासा शहरातील व्यवसायिकांनी अतिक्रमण काढण्याचे अंतर पंधरा मीटरवरून बारा मीटर असे कमी करण्यासाठी अनेक आंदोलने केली होती. मात्र प्रशासनाकडून कुठलीही तडजोड न करता अखेर शेवटी कच्ची व व पक्की अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आले. यामुळे अनेक सर्वसामान्य गोरगरिबांची रोजीरोटी बंद झाल्याने अनेक व्यवसायिकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. तर रस्त्यावरील अतिक्रमण काढल्याने रस्ता रुंद झाला होता.
            श्रीरामपूर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाने आज सोमवार रोजी सकाळी सुरू करण्यात आली. नेवासा शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रा असल्याने अतिक्रमण काढण्याची कारवाई काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आली होती. अतिक्रमण काढण्याच्या बाबतीत 15 दिवसांपूर्वीच सर्व व्यवसायिकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. रस्त्याच्या मध्यभागापासून पंधरा मीटर अंतरावरील अतिक्रमण काढण्यात येईल असे नमूद करण्यात आले होते. प्रशासनाच्या नोटिसनुसार अतिक्रमणधारक व्यावसायिकांनी आपले अतिक्रमण काढून दुकाने मोकळी केली होती.
 
         
               तीर्थक्षेत्र व तालुका क्षेत्र असलेले नेवासा येथील नेवासा फाटा, श्रीरामपूर मार्गावर अधिक दुकाने आहेत. या मोहिमेअंतर्गत अतिक्रमण हटवल्याने सुमारे 965 दुकाने बंद होणार आहेत त्याचा फटका व्यावसायिक व त्यांच्या कुटुंबीयांना बसणार आहे या मोहिमेमुळे गावातील 90 टक्के दुकाने नष्ट होऊन संपूर्ण बाजारपेठ विस्थापित होत आहे.
         प्रशासनाने व्यवसायासाठी पर्याय जागा देण्याची मागणी व्यावसायिक करत आहेत. अनेक दिवसांपासून सुरू असलेले अतिक्रमण हटवण्याचे काम प्रशासनाने अखेर कोणालाही न जुमानता 15 ते 20 जेसीबी 25 ते 30 डंपर 20 ते 25 ट्रॅक्टर हे अतिक्रमणाचा मलबा वाहतूक करण्याचे काम सुरू होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!