google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

नेवाशात अवैध वाळू चोरी!

चौघांवर गुन्हा दाखल; प्रवरापात्रातून होत होता वाळू उपसा

                                    स्वराज न्यूज नेटवर्क 

नेवासा : येथील प्रवरा नदीपात्रातून विनापरवाना बेकायदा वाळू काढून तिचा साठा करत असताना नेवासा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 15 हजार रुपये किमतीचे 4 ब्रास वाळूचे दोन ढिगारे व वाळू भरण्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला असून ज्याच्या सांगण्यावरुन वाळू उपसा केला जात होता तो इसम अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

              याबाबत पोलीस नाईक राहुल यादव यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 3 एप्रिल रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास नेवासा खुर्द येथील ज्ञानेश्वर मंदिराच्या मागे प्रवरा नदीपात्रात गरीबन प्रसाद भगवान बिंद (वय 50) रा. रसुलपूर गाजीपूर (उत्तरप्रदेश), संजयकुमार महेंद्र बिंद (वय 35) रा. करीमुद्दीनपूर (उत्तरप्रदेश), विरेंद्र रामजतन बिंद (वय 42) रा. गाजीपूर (उत्तरप्रदेश) हे विनापरवाना बेकायदा वाळू काढून ढिगारा बनवून साठा करताना मिळून आले. त्यांच्याकडे कोणताही परवाना नव्हता.

              वरील नमूद इसमांनी 15 हजार रुपये किंमतीचे 4 ब्रास वाळूचे दोन ढिगारे केले होते. त्यांच्याकडून 700 रुपये किमतीचे तीन प्लॅस्टीकचे घमेले व दोन वाळू भरण्यासाठीचे खोेरे असा 15 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तुम्ही कोणाच्या सांगण्यावरुन वाळू काढीत आहात? असे विचारले असता तेव्हा त्यांनी गोरख ऊर्फ भावड्या जगन्नाथ जाधव रा. नेवासा खुर्द याचे नाव सांगितले.

          बेकायदेशीररित्या प्रवरा नदीपात्रातून वरील वर्णनाची व किमतीची वाळू चोरुन नेणेकरीता काढून साठा केला म्हणून वरील सर्वांविरुद्ध गुरनं. 380/2023 भारतीय दंड विधान कलम 379, 34 सह गौण खनिज कायदा कलम 3/15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!