google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

प्रेमसंबंधातून तरुणाचा खून

अपघाताचा बनाव उघड; दोन आरोपी अटकेत; नगर तालुक्यातील घटना 

                                      स्वराज न्यूज नेटवर्क 
अहिल्यानगर : प्रेमसंबंधातून तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा बनाव केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष स.पो.नि प्रल्हाद गीते यांच्या तपासातून उघडकीस आली आहे. सुरूवातीला अपघाताचा गुन्हा दाखल झालेल्या या प्रकरणात आता खून, कटकारस्थान आणि बनाव या गंभीर कलमांची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी विश्वजीत सुभाष पोटे व संकेत बाळासाहेब बंडाले दोघे राहणार दादेगाव तालुका आष्टी जिल्हा बीड या दोन जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 
                मृत तरूणाच्या प्रेमप्रकरणातून सूड घेण्यासाठी ही हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. ही घटना ३० मे रोजी सायंकाळी टाकळी काझी (ता. अहिल्यानगर) शिवारातील हॉटेल रायबा समोर घडली. आदेश नंदू घोरपडे (वय २२, रा. कायनेटिक चौक, अहिल्यानगर) हा तरूण आणि त्याचा मित्र मोहित संतोष निमसे (वय २०, रा. रंगोली चौक, केडगाव) दुचाकीवरून नगरच्या दिशेने येत असताना आरोपी त्यांचा बुलेटवरून पाठलाग करीत होते.  तेव्हा बुलेटवरील आरोपींनी व इतर आरोपीनी आरोपी अमर सुभाष पोटे यास फोन करून तू नगरच्या दिशेने कुठपर्यंत आला. मयत हा कुठपर्यंत आलाय. आम्ही त्याच्या मागे आहोत. बाबत माहिती देऊन पिकअपवरील अमर कुठे यास मयतास उडविण्यास सांगितले. त्याने टाकळी काजी गावच्या शिवारातील हॉटेल रायबा समोर मयतास व त्याचे मित्रास उडविले. यात घोरपडे याचा मृत्यू झाला होता. व मोहित निमसे जखमी झाला. मोहित निमसे याने या प्रकरणी २ जून रोजी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात पिकअप चालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मृत घोरपडेच्या आईने हा अपघात नसून तिच्या मुलाचा खून झाल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलून अधिक सखोल चौकशी केली असता ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले. 
            यासंदर्भात तालुका पोलीस ठाण्याचे स.पो.नि प्रल्हाद गिते यांनी सांगितले की, आदेश घोरपडे याचे बीड जिल्ह्यातील दादेगाव (ता. आष्टी) येथील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र तिच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवले होते. याची माहिती घोरपडे याला मिळाल्यानंतर त्याने मोहित निमसे व इतर चार मित्रांसह ३० मे रोजी दादेगाव गाठले. तेथे मुलीच्या नातेवाईकांशी त्याचा वाद झाला. या वादानंतर घोरपडे व निमसे दुचाकीवरून पळून आले, तर त्यांचे इतर मित्र चारचाकीने परतले. यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी पाठलाग सुरू केला. दरम्यान, घोरपडे व निमसे हे टाकळी काझी शिवारातून जात असताना पिकअप वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत घोरपडे जागीच ठार झाला. 
            हा अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात पोलिसांनी विश्वजीत सुभाष पोटे (वय २५) आणि संकेत बाळासाहेब बंडाले (वय २७, दोघे रा. दादेगाव) तसेच आज दिनांक 5 जून रोजी आरोपी अमरसिंह सुभाष पोटे व धनंजय सुभाष फुंदे दोघे राहणार दादेगाव तालुका आष्टी जिल्हा बीड अशा एकूण चार आरोपींना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू असून आणखी आरोपीतांचा  कटात सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यांचा शोध सुरू असल्याचे गिते यांनी सांगितले.
            सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे  सो, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी  अमोल भारती, नगर शहर विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे  स.पो.नि. प्रल्हाद गीते पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे, पोहेकॉ सुभाष थोरात, पोहेकॉ रवी सोनटक्के, पोहेकॉ बाबासाहेब खेडकर, पोकॉ संभाजी बोराडे, पोकॉ सागर मिसाळ, पोकॉ विक्रांत भालसिंग, पोकॉ राजू खेडकर तसेच पोकॉ नितीन शिंदे नेम – दक्षिण विभाग मोबाईल सेल आदींच्या पथकाने केली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!