google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

चोरीस गेलेले टाळ मिळाले परत

नेवासा पोलिसांची कामगिरी; 22,400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत 

                                      स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : तालुक्यातील रांजणगाव देवीचे येथील भजनी मंडळाचे 22400 रुपये किमतीचे चोरीला गेलेले 28 पितळी टाळ नेवासा पोलिसांनी तपास करून पुन्हा मिळवत भजनी मंडळास पुत्रदा एकादशीच्या मुहूर्तावर सुपूर्त केले.
            या संदर्भातील हकीकत अशी आहे की, रांजणगाव देवीचे ता. नेवासा येथील दि. 28 जुलै रोजी सकाळी सिद्धेश्वर भजनी मंडळाचे 22400 रुपये किमतीचे 28 पितळी टाळ चोरीला गेल्याचे दिसुन आल्यानंतर पोलीस ठाणे नेवासा येथे अशोक बाबासाहेब चौधरी वय 60 वर्ष रा. रांजणगाव देवी ता. नेवासा यांनी फिर्याद दाखल केली होती. 
          या फिर्यादीला अनुसरून पोलीस ठाणे नेवासा येथे अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद करून तपास पोलीस नाईक बाबा वाघमोडे यांच्याकडे देण्यात आला होता. चोरीचा गुन्हा नोंद केल्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली होती. या कामी पोलीस ठाणे नेवासाकडील डी.बी. पथक कामास जुंपले होते. तपासादरम्यान पोलिसांनी मंदिराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास एक ऑटोरिक्षा संशयास्पद फिरताना दिसून आली होती. 
            नेवासा पोलिस हाच धागा पकडून सीसीटीव्ही फुटेज तपासत संशयास्पद रिक्षाचा माग काढीत शेवगावपर्यंत गेले होते. शेवगावमध्ये गेल्यानंतर सदरची रिक्षा राजू भगवान नागरे रा. दादेगाव रोड, शेवगाव यांच्या मालकीची असून राजू नागरे व संगीता सूर्यकांत सर्जेराव रा. कापकर वस्ती, शेवगाव या दोघांना ताब्यात घेवून विचारपूस केल्यानंतर प्रथमतः आम्ही असे काही केलेच नाही असे पोलिसांना सांगितले. परंतु पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवून पुन्हा बारकाईने विचारपूस केली असता रांजणगाव देवी येथील सिद्धेश्वर मंदिरातून पितळी टाळ चोरल्याचे कबूल केले. 
             या चोरी प्रकरणी राजू भगवान नागरे व संगीता सूर्यकांत सर्जेराव यांना अटक करून 22400/- रुपये किमतीचे 28 पितळी टाळ व ऑटो रिक्षा पोलिसांनी जप्त केली होती. चोरीस गेले टाळ पोलिसांनी मंगळवारी श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीच्या मुहूर्तावर विधीवत परत केल्यानंतर भजनी मंडळाने आनंद व्यक्त केला आहे. याप्रसंगी सिद्धेश्वर भजनी मंडळाचे अध्यक्ष अशोक चौधरी, अशोक रोडगे, नानासाहेब चौधरी व सारंगधर वाकचौरे इत्यादी हजर होते.
              सदरचा तपास पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुनील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल श्रीनाथ गवळी, नारायण डमाळे, गणेश जाधव व अमोल साळवे यांनी केला.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!