google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

मुम्मका सुदर्शन नगरचे नवे एसपी

सोमनाथ घार्गे यांची मुंबई येथे बदली; राज्यातील 21 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

                                      स्वराज न्यूज नेटवर्क 

मुंबई : गृहविभागाने राज्यातील 21 आयपीएस अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या केल्या आहेत. अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली मुंबई येथे पोलिस महासंचालक कार्यालयात सहायक पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली झालीय. तर चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची घार्गे यांच्या जागी नियुक्ती झाली आहे. घार्गे हे गेल्याच वर्षी नगर जिल्ह्यात बदलून आले होते.

             जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय के. बन्सल यांची महाराष्ट्र सायबर सुरक्षा एसपी म्हणून बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी तेगबीर सिंह संधु यांची नियुक्ती झाली आहे. ते मालेगावला अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्तीला होते.

कुणाची कुठे बदली ?

          जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय के बन्सल यांची महाराष्ट्र सायबर सुरक्षामध्ये बदली झाली आहे. तर अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सिंगुरी विशाल आनंद यांची धुळे पोलिस अधीक्षकपदी बदली झालीय. तर नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची मुंबईत पोलिस उपआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. परभणीचे पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह एस परदेशी यांची मुंबईला, राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त संदीप घुगे यांची मुंबई शहरात, नंदुरबारचे पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांची अपर पोलिस महासंचालक आणि सहायक पोलिस महानिरीक्षक अस्थापना यांचे स्टाफ ऑफिसर म्हणून बदली झालीय. चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची नगरचे एसपी, वाशिमचे पोलीस अधीक्षक अनुज मिलिंद तारे यांची पुण्यात अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची मुंबई शहर उपायुक्त, लोहमार्ग पुणे पोलिस अधीक्षक अश्विनी सानप या नंदुरबारचे पोलिस अधीक्षक असणार आहेत. तर मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधु हे जालन्याचे नवे पोलिस अधीक्षक असणार आहेत.

          पुणे शहराचे पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्याकडे लोहमार्ग (पुणे) पोलीस अधीक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्यातील अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे निकेश खाटमोडे हे वाशिमचे पोलिस अधीक्षक असणार आहेत. तर आयुष नोपानी यांची चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत हे परभणीचे पोलिस अधीक्षक असणार आहेत. तर निकेतन कदम हे अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक, सुरज गुंजाळ मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक असणार आहेत. गजानन राजमाने यांची फोर्स वनमधून मुंबई शहरात, तर दत्ता तोटेवाड यांची अमरावतीला अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!