google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवासा पोलीस स्टेशनचे कारभारी बदलले

सागर ढिकले नवे पोलीस निरीक्षक; महेश पाटील नियंत्रण कक्षात 

                                      स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : आज मंगळवार (दि. 21) रोजी नेवासा पोलीस ठाण्यात नव्याने रुजू पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी चार्ज घेतला. नेवासाचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची पोलीस नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली आहे.
        पोलीस निरीक्षक सागर ढिकले हे अहिल्यानगर जिल्ह्यातील सायबर क्राईम आणि आर्थिक गुन्ह्यांच्या तपासात सक्रिय अधिकारी आहेत. सागर ढिकले हे तांत्रिक विश्लेषणाद्वारे गुन्ह्यांचा छडा लावण्यात माहीर आहेत. शनी शिंगणापूर मंदिर देणगी घोटाळ्याचाही तपास त्यांच्याकडे होता.ढिकले हे सायबर सेल येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. सायबर सेलमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!