google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

सेंट मेरीज शाळेचे दहावी परीक्षेत घवघवीत यश

सलग २३ व्या वर्षी 100% निकालाची परंपरा कायम

                                    स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : अहिल्यानगर प्रभागातील नामांकित सेंट मेरीज स्कूलने यंदाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सलग २३ वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत शाळेने नेवासा तालुक्यात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. शाळेच्या या यशामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
                यंदाच्या परीक्षेत शाळेतील एकूण ९६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी १३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत विशेष यश संपादन केले आहे. तसेच ७८ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत विशेष प्रावीण्य प्राप्त केले, तर १५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
                शाळेचे विद्यार्थी भूषण सतीश क्षीरसागर याने ९६.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. स्वराली गणेश नांदे हिने ९६.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर तनिष्का सोमनाथ उंदरे हिने ९५.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
              विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेतील शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. मुख्याध्यापिका सिस्टर ज्योतिस, शालेय व्यवस्थापिका सिस्टर मारिया, सिस्टर लिसा, सिस्टर मुक्ता यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
           वर्गशिक्षक विजय लोंढे, संदीप सरोदे, सिस्टर मारिया, सकिना शेख, स्वाती पाटील, तृप्ती वाघ, विकास बोर्डे, प्रशांत गायकवाड, मुबीना शेख, वैशाली ससाणे, विष्णू खांदोडे, प्रतीक मगर आणि पापा शेख यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन व परिश्रम यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. सेंट मेरीज स्कूलच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पालक, माजी विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांकडून शाळेचे अभिनंदन करण्यात येत आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!