google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवासा फाट्यावरील तीन हॉटेलवर पोलिसांचा छापा

११ महिलांची सुटका, १० जणांवर ‘पिटा’ अंतर्गत गुन्हा दाखल

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : नेवासा फाटा परिसरातील काळ्या धंद्यांचा पोलिसांनी शनिवार (दि. 9 मे) संध्याकाळी पर्दाफाश केला. हॉटेल आणि लॉजच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत मोठी कारवाई केली. तिरंगा, मित्रप्रेम आणि नामगंगा या तीन नामांकित लॉजवर टाकलेल्या छाप्यात ११ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, मालक, मॅनेजर आणि ग्राहकांसह १० जणांविरुद्ध ‘पिटा’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
             नेवासा फाटा येथील काही लॉजमध्ये महिलांकडून बळजबरीने देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना मिळाली होती. माहितीची गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव आणि नेवासा पोलिसांचे एक विशेष संयुक्त पथक तयार करण्यात आले.
            पोलिसांनी अतिशय नियोजनबद्ध रीतीने या मोहिमेची आखणी केली. खात्री करण्यासाठी पोलिसांनी तीन डमी ग्राहक तयार केले आणि त्यांच्याकडे ५०० रुपयांच्या चिन्हांकित नोटा देऊन त्यांना तिरंगा, मित्रप्रेम आणि नामगंगा लॉजवर पाठवले. डमी ग्राहकांनी इशारा करताच सज्ज असलेल्या पोलीस पथकाने एकाच वेळी तिन्ही ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडसी कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

             या छाप्यात धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हॉटेल मालक आणि मॅनेजर गरिबीचा फायदा घेऊन महिलांना पैशाचे आमिष दाखवत होते आणि त्यांच्याकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून आक्षेपार्ह साहित्य आणि डमी ग्राहकांना दिलेल्या नोटा जप्त केल्या आहेत. सुटका करण्यात आलेल्या ११ पीडित महिलांना सुरक्षितपणे नेवासा पोलीस ठाण्यात हलवण्यात आले आहे.

          या प्रकरणी पोलिसांनी तिरंगा हॉटेल मालक प्रकाश शेंडगे (रा. नेवासा खुर्द) हॉटेल मॅनेजर इक्बाल अबुल मंडाल  (रा. कल्याण, जि. ठाणे) मित्रप्रेम हॉटेल मालक सचिन कोळेकर (रा. नेवासा), हॉटेल मॅनेजर सुरेश बन्सी कांबळे (रा. मुकिंदपूर, ता. नेवासा) नामगंगा हॉटेल मालक अजय कोळेकर (रा. नेवासा), हॉटेल मॅनेजर अजित सुभाष बर्डे (रा. मक्तापूर, ता. नेवासा) यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. तसेच या अनैतिक व्यवसायाला खतपाणी घालणारे ग्राहक अमोल एकनाथ पारखे (रा. कायगाव, ता. गंगापूर), दिपक बाबासाहेब शिंदे (रा. वडाळा, ता. नेवासा), प्रणव नवनाथ नजन (रा. माळी चिंचोरा, ता. नेवासा), दिपक रघुनाथ वांदेकर (रा. बेलापूर) यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

           या कारवाईत महिलांना पैशाचे आमिष दाखवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून गुन्हा रजिस्टर क्रमांक 363/2026 भारतीय न्याय संहिता कलम 143 सह  स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 (PITA) चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
              सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक सागर ढिकले, सपोनि रामहरी खेडकर, सपोनि अमोल पवार, पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप आव्हाड, पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर, संपत खेडकर, भगवान सानप, शाम गुंजाळ, देविदास तांदळे, मपोशि प्रियंका शिरसाठ. सफौ नागरगोजे, पो हवा राठोड, पोना काळोखे, पोना किरण पवार, पोशि गंगावणे, मपोशि जाधव, पोशि जाधव यांनी केली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!