
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा खुर्द येथील रहिवासी राजेश श्रीकिसन उपाध्ये (वय ४५) यांचा ‘ओप्पो A17’ हा मोबाईल सोमवारी (दि. १२ मे) दुपारच्या सुमारास हरवला होता. याबाबत त्यांनी तातडीने नेवासा पोलीस ठाण्यात माहिती दिली.
तक्रार प्राप्त होताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नारायण डमाळे व पोलीस कॉन्स्टेबल एच. पी. धायतडक यांनी तांत्रिक तपासाची चक्रे वेगाने फिरवत मोबाईलचा शोध सुरू केला. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे हरवलेला मोबाईल अवघ्या दोन तासांच्या आत शोधण्यात यश आले.
संबंधित मोबाईल तक्रारदार राजेश उपाध्ये यांच्या स्वाधीन करण्यात आला. अत्यंत कमी वेळेत मोबाईल परत मिळाल्याने उपाध्ये यांनी नेवासा पोलिसांच्या कार्यक्षमतेचे व तत्परतेचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. या कारवाईमुळे नेवासा पोलिसांच्या जलद प्रतिसादाचे सर्वत्र स्वागत होत आहे.



