google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

राजकिय

नेवासा येथे संविधान दिन उत्साहात साजरा

पथ संचालन, मोटरसायकल रॅली व संविधान उद्देशिका वाचन व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन

स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : नेवासा येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दिवसभर पथ संचालन, मोटरसायकल रॅली व संविधान उद्देशिका वाचन तसेच प्रबोधन पर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
     
        नेवासा फाट्याजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकरनगर येथून रॅलीला सुरुवात झाली. या संविधान रॅलीत प्रमुख आकर्षण म्हणजे संविधानाने सजवलेला रथ मिरवणुकीत शोभा वाढवत होता. या वेळी रथामागे मोटारसायकल रॅली व संविधान दिनाच्या घोषणांनी नेवासा फाटा व नेवासा शहर परिसर दणाणून गेला होता. मोटार सायकल रॅलीमध्ये संविधान प्रेमींचा मोठ्या उत्साहात सहभाग दिसून आला.
               
           डॉ बाबासाहेब आंबेडकर एकता समिती, नेवासा तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये अहिल्याबाई होळकर चौक, राजमुद्रा चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, अहिल्यानगर येथे उन्हवणे ताई व मोठ्या प्रमाणात महिला मंडळाने या रॅलीचे स्वागत केले. तसेच काॅलेज परिसरातही रॅलीचे स्वागत करण्यात आले. पुढे नेवासा शहरात आगमन होताच गणपती चौकात नितीन मिरपगार व मित्र मंडळाने स्वागत केले. या नंतर शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली ज्ञानेश्वर चौकात येताच रॅलीचे फटक्यांच्या आतिषबाजी करून सावित्रीबाई फुले /फातिमा शेख सार्वजनिक वाचनालय तेथे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सुनील वाघ यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी सतीश गायके, शांताराम गायके, अनिल सोनवणे, संतोष चव्हाण, सनी चव्हाण, शुभम चव्हाण, शशी मावसकर आदी उपस्थित होते.
             रॅलीचे औदुंबर चौकात रंजन जाधव व मित्र मंडळाने स्वागत केले. रॅलीचा समारोप चक्रनारायण वसाहत येथे हरिष चक्रनारायण मित्र मंडळाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. या वेळी भत्तेजी उपाली बौद्धि यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व उपस्थित  आंबेडकरी जनतेस मार्गदर्शन  केले.
         
         संपूर्ण रॅली यशस्वी होण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर एकता समिती, नेवासा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश चक्रनारायण बामसेफचे गणपतराव मोरे, बहुजन समाज पार्टीचे विकास चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन जाधव, बी. बी. पंडित, लिहीनार मामा, प्रवीण सरोदे, अँड. चंद्रकांत कदम, अँड. भारत भूषण मौर्य, सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे, सतीश खरचंद आदींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. या वेळी आभार लिहिणार मामा यांनी प्रकट केले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!