
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यातील देडगाव ते तेलकुडगाव जाणारे रोडवर घेतलेल्या अंग झडतीत गावठी कट्टा मिळून आल्याने एकाला पकडण्यात नेवासा पोलिसांना यश मिळाले तर त्याचा दुसरा साथीदार हा पळून जाण्यात यशस्वी ठरला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नेवासा तालुक्यातील देडगाव ते तेलकुडगाव जाणारे रोडवर चोरी करण्याचे इरादयाने अगर घातपात करण्याचे तयारीने सोमवार दि. 19 रात्री अकरा वाजता विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे जेऊर हैबती ता.नेवासा याचे अंगझडतीत त्याचे कमरेला खवलेला एक देशी बनावटीचा पिस्तुल लोखंडी धातुचा त्याचे बटास दोन्ही बाजुने प्लॅस्टीक काळे रंगाची मुठ, पट्टीसारखा ट्रेगर असलेला जुना वापरता दहा हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व दोन हजार रुपये किंमतीची एक पिवळ्या धातुची पिस्तुल बुलेट (जिवंत कारतुस) ताब्यात घेण्यात आली. यावेळी त्याचा साथीदार सुनील दिलीप चव्हाण (गाव माहित नाही) काळया रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर (एम एच 17 जे 4427) मोटार सायकल सोडुन पळुन गेला.
पोकॉ नारायण एकनाथ डमाळे वय 33 वर्षे नेम नेवासा पोस्टे जि. अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं.-159/2024 भारतीय हत्यार कायदा क. 3/25 प्रमाणे विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे व त्याचा साथीदार सुनील दिलीप चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोना घुगे हे करत आहेत