google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

राजकिय

शिवसेना सदस्य नोंदणीस उत्तम प्रतिसाद

नेवासा तालुकाप्रमुख संजय पवार यांची माहिती

                                  स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे आणि खा. सदाशिव लोखंडे, संपर्क प्रमुख यशवत जाधव यांच्या आदेशाने तसेच जिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुक्यात शिवसेना सदस्य नोदणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या नोंदणीस उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख संजय पवार यांनी सांगितले.
            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. लोखंडे यांच्यावर लोकांचा विश्वास मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे तालुक्यातील जनता शिवसेना सदस्य नोंदणीस उत्तम प्रतिसाद देत आहे. विशेष म्हणजे महिलांचा प्रतिसाद खूप सकारात्मक असल्याचे पवार यांनी सांगितले. सरकारचे महिला विषयी धोरण, लेक लाडकी योजना, बस प्रवासात पन्नास  टक्के सवलत, बचत गटांना प्रोत्साहन, महिलांना आरोग्य सवलती यामुळे ग्रामीण भागातील महिला या शिवसेनेकडे अपेक्षेने पाहत आहे.
          शेतकरी वर्ग आणि युवा वर्गाचेही शिवसेनेकडे विशेष आकर्षण आहे. लवकरच खा. सदाशिव लोखंडे आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर पाटील आणि जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार यांच्या उपस्थितीत तालुक्यातील हजारो युवक लवकरच शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. या सदस्य नोंदणीसाठी सर्व पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत, असे ही पवार म्हणाले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!