google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजन

विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन महत्त्वाची

गटशिक्षणाधिकारी कराड यांचे प्रतिपादन; जिप प्राथमिक शाळा, पानेगांव वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 
पानेगांव : विद्यार्थ्यांचा कला गुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन महत्त्वाची असतात असे प्रतिपादन नेवासे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पानेगांव वार्षिक स्नेहसंमेलनात केले.
            गटशिक्षणाधिकारी कराड यांनी म्हटले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी आता मागे नाही. वेगवेगळ्या कला त्यांचा अंगात असतात ह्या कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ शिक्षण विभागाच्या वतीने राज्यभरात आयोजन करण्यात येते. शासन स्तरावरून निधी नसताना शिक्षक वृंद, ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकारी गावातील सामाजिक कार्यकर्ते यांचा अर्थिक मदतीने हे आयोजन होत असते. येथिल शाळा तालुक्यात आदर्शवत असून येथील शिक्षक वृंद तसेच शाळेसाठी योगदान देणाऱ्यांचे विशेष कौतुक कराड यांनी करुन जिल्हा स्तरावर आदर्श शाळा म्हणून पुरस्कार मिळावा, यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेल कराड यांनी सांगितले.
               यावेळी मा. लोकनियुक्त सरपंच मुळाचे संचालक संजय जंगले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शाळेसाठी नेहमीच अग्रभागी असतो. तालुक्यात डिजिटल शाळा त्याचबरोबर येथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शाळा बघण्यासाठी जिल्हा, तालुकास्तरावरील अधिकारी तसेच नेहमी लोक येत असतात. जवळपास तीन तास चाललेल्या कार्यक्रमात चिमुकल्यांचा तालावर आनंदाच्या जल्लोषामध्ये नव्या जुन्या देशभक्ती गीते गाण्यांबरोबरचं छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनावरील छावा चित्रपटातील गीताचे मोठे आकर्षण या निमित्ताने ठरले. यावेळी भरभरून प्रतिसादाबरोबरच बक्षीस मोठ्या प्रमाणावर मिळाले.
           यावेळी जिल्हा परिषद सोनई केंद्र प्रमुख हनुमंत फुंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय जंगले, पानेगांव लोकनियुक्त सरपंच सौ.निकीता भोसले-आंबेकर, उपसरपंच दत्तात्रय घोलप, मुख्याध्यापक विष्णू दहिफळे, मच्छिंद्र खेमनर, अरुण ढेरे, छाया देठे, संकेत गुडधे, मंगल गुडधे, सविता जंगले, गोदा चिंधे, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले, ग्रामपंचायत सदस्य सतिश जंगले, ज्ञानेश्वर जंगले, माजी सरपंच हौशाबापू जंगले, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष किशोर जंगले, महालक्ष्मी देवस्थान अध्यक्ष अमित जंगले, आमराई उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरज जंगले, पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील, नामदेव गुडधे, अनिल चिंधे, उत्तम तांबे, ज्ञानदेव गुडधे, तंटामुक्ती अध्यक्ष उद्धव चिंधे, उपाध्यक्ष सुरेंद्र जंगले, मुळाचे संचालक रंगनाथ जंगले, बाबासाहेब शेंडगे, गणेश गायकवाड, सुनिल चिंधे, शुभम जंगले, मोहनराव दहिफळे, लक्ष्मीकांत जंगले, आरुण सोनवणे, गणेश जंगले, रामदास गागरे, लक्ष्मण गागरे, रविंद्र सोनवणे, प्रविण सोनवणे, किरण जंगले आदींसह ग्रामस्थ महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन संदिप जंगले यांनी केले तर आभार संकेत गुडधे यांनी मानले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!