क्रिडा व मनोरंजन
सेंट मेरीज शाळेचा वार्षिकोत्सव उत्साहात
आकर्षक वेशभूषेत विद्यार्थ्यांचा वार्षिक उत्सवात सहभाग; वार्षिक उत्सवाची थीम 'न्यू ब्लूम, न्यू बिगिनिंग'; नाटक व नृत्यांचा डोळ्यांचे पारणे फेडणारा अविष्कार; प्रमुख पाहुण्यांकडून कार्यक्रमाचे कौतुक
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : अहिल्यानगर येथील सेंट मेरीज शाळेचा वार्षिक उत्सव शुक्रवारी (दि.16) उत्साहात संपन्न झाला. यात विद्यार्थ्यांनी एकाहून एक अशा सरस कार्यक्रमांच्या सादरीकरणाने उपस्थित पालकांची मने जिंकून घेतली.

वार्षिक उत्सवाची थीम ‘न्यू ब्लूम, न्यू बिगिनिंग’ होती. विद्यार्थ्यांनी समूह स्वरूपात या थीमशी केंद्रित कार्यक्रमाचे सादरीकरण केले. स्वागत गीताने कार्यक्रमाची औपचारिकता सुरू झाली. त्यानंतर मुलांनी प्रार्थना नृत्य, स्वागत संदेश, स्वागत गीत, एंटरटेनमेंट डान्स, बटरफ्लाय डान्स, फार्मर डान्स, स्नो व्हाईट नाटिका , स्पोर्ट डान्स, वेस्टर्न डान्स, स्वच्छ भारत, लोकनृत्य लावणी, मोबाईल एडिक्शन डान्स, ख्रिसमस डान्स, कर हर मैदान फतेह मोटिवेशनल गीत आदींचे प्रदर्शन केले.

कार्यक्रमात लहान मुलांनी विविध रंगांची उधळण केली. वार्षिकोत्सवामध्ये वर्षभर विविध स्पर्धांचे विजेते राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरणही केले गेले. सेंट मेरीज ज्योती अवॉर्ड अंजली शेवाळे या विद्यार्थिनीस तर आदर्श विद्यार्थ्यांचा बहुमान अनुष्का खराड़े या विद्यार्थिनीस देण्यात आला.

मुख्य अतिथींच्या भाषणामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. डॉ सुधीर तांबे यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच खेळ आणि सामाजिक कार्यामध्ये सहयोग करण्याचे आवाहन पालकांना केले. ते म्हणाले शिक्षण व नियमाने मुलांचा सर्वांगीण विकास होतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक विजय करे व गट शिक्षण अधिकारी शिवाजी कराड हे होते. पोलीस निरीक्षक विजय करे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पालकांनी मुलांची मानसिकता ओळखली पाहिजे. लहान मुलांशी जास्त वेळ घालवला पाहिजे. मुलांना घरी उत्तर मिळत नाही. त्यामुळे ते बाहेर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. बाहेरच्यांचा आधार घेतात. यावेळी बोलताना त्यांनी वेळेचे नियोजन, चांगले संस्कार, फास्ट फूडच्या दुष्परिणामाविषयी मार्गदर्शन केले.

अन्य पाहुण्यांमध्ये ज्ञान माऊली चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर दिलीप जाधव, फादर जॉन गुलदेवकर, सिस्टर फ्लोरा, सिस्टर बिंदु, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष भागवत खराड, मच्छिंद्र दिवटे, डॉ. सुरेश गणगे, श्रीकांत वरुडे प्रवरा संगमच्या सरपंच अर्चना सुडके, डॉ. निर्मला सांगळे, डॉ. मनीषा दरंदले, ॲड. स्मिता लवांडे, स्मिता खरात, पत्रकार सुधीर चव्हाण, आप्पासाहेब बेंद्रे, समी शेख उपस्थित होते.

मुख्याध्यापिका सिस्टर जोसी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मुबीना शेख व सोनाली कालाणे यांनी केले. शाळेच्या वार्षिक अहवालाचे वाचन विराज सूर्यवंशी, सुतेज भुजबळ, प्रियंका घोलप व रिद्धी माने या विद्यार्थ्यांनी केले. शाळेच्या व्यवस्थापिका सिस्टर मौली यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिस्टर लिसा, विजय लोंढे, संदीप सरोदे, रमेश निमसे, विष्णु खांदोडे, प्रशांत गायकवाड, सुरेश लव्हाटे, सकीना शेख, स्वाती पाटील, शबाना शेख, वंदना वाघमारे, तृप्ती वाघ, मंजुषा साळवे, अनिता मारकळी, नूतन आहेर, सुशीला लोंढे, सना कौसर शेख, रेश्मा लोखंडे, वैशाली साळवे, वैशाली ससाणे, संगीता पातारे, मीनल जाधव, मेघा शिंदे, प्रतिभा पातारे, पल्लवी भालेराव, ऋतुजा भालेराव, सुजाता भालेराव आदींनी प्रयत्न केले.