google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजन

पानेगांवात छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात

फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणूक; शिवप्रेमींची अलोट गर्दी

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 
बाळासाहेब नवगिरे (पानेगांव) : नेवासे तालुक्यातील पानेगांव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा समोरील आकर्षक रांगोळी विविध फुलांची सजावट करण्यात आली. शिवस्मारक सोहळा समितीच्या सदस्यांनी आठवडा भरापासून जय्यत तयारी सुरू केली होती. सकाळी ९ वाजता तोफांचा, फटाक्यांचा आताषबाजीने शिवमय वातावरणात श्री रामकृष्ण आश्रम गोणेगांव महंत हभप भगवान महाराज शास्त्री व शेतकरी निवृत्ती पांडुरंग बारवकर यांच्या हस्ते पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानेगांव विद्यार्थ्यांनी झांज, लेझीम पथक तयार करुन शिवकालीन दृश्य सादरीकरण करण्यात आले. पोवाडा गायनाने शिवमय वातावरण निर्माण झाले होते.
               चार वर्षांपूर्वी मा. मंत्री शंकरराव गडाख पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद मा. सभापती लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील यांच्या निधीतून छत्रपती शिवाजी महाराजांच शिवस्मारक सुशोभीकरण करण्यात आले. दिवसभर परिसरातून, तालुकाभरातून शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी पारंपरिक वाद्ये, फटाक्यांचा आतिषबाजीने छत्रपतींचा वेशभूषेत गावात मिरवणूक काढण्यात आली.
            शिवस्मारक सोहळा समितीचे महेश जंगले, लक्ष्मीकांत जंगले, संकेत गुडधे, गणेश कापसे, सूरज जंगले, सुजित नवगिरे, विशाल जंगले, हितेश जंगले, डॉ. सुरज जंगले, शंकर जंगले, मयूर जंगले, बाबाराजे गुडधे, किरण जंगले, नयन जंगले हरीश जंगले, राजेंद्र जंगले, आकाश जंगले, बाबासाहेब शेंडगे, विजय वाघुले, संदिप जंगले, दिपक जंगले, गणेश गायकवाड, अँड. किरण जंगले, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले आदींनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!