google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

कृषीवार्ता

आपत्ती निधीमध्ये केंद्र सरकारकडून सुधारणा

अशी मिळेल सुधारित मदत

                            स्वराज न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ)साठी केंद्र सरकारने निकष आणि दरांमध्ये सुधारणा केल्या असून, त्या सुधारणा स्वीकृत करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

           या सुधारणा 2025-26 पर्यंत असतील. तसेच या निर्णयांची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर, 2022 पासून होणार आहे. मदतीचे सुधारित दर पुढील प्रमाणे (कंसात जुने दर) :

मृतांच्या कुटुंबियांना – 4 लाख रुपये (बदल नाही). चाळीस ते ,60 टक्के अपंगत्व आल्यास – 74 हजार रुपये ( 59 हजार 100). साठ टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास – 2.50 लाख रुपये (2 लाख).

जखमी व्यक्ती इस्पितळात एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी – 16 हजार रुपये (12 हजार 700), एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी – 5 हजार 400 ( 4 हजार 300).

 

दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र/घर पाण्यात बुडालेले असल्यास/घरे पूर्णत: वाहून गेली असल्यास/ पूर्णत: क्षतीग्रस्त झाल्यास प्रति कुटुंब – 2 हजार 500 (बदल नाही). सामानाच्या नुकसानीकरिता प्रति कुटूंब – 2 हजार 500 (बदल नाही).

पूर्णत: नष्ट झालेल्या पक्क्या/कच्च्या घरांसाठी सखल भागात– 1 लाख 20 हजार रुपये ( 95 हजार 100). दुर्गम भागातील घरांसाठी – 1 लाख 30 हजार (1 लाख 1 हजार 900)
अंशत: पडझड पक्क्या घरांसाठी – 6 हजार 500 (5 हजार 200).
अंशत: पडझड कच्च्या घरांसाठी – 4 हजार रुपये (3 हजार 200).
झोपडीसाठी – 8 हजार रुपये (4 हजार 100).

मृत दुधाळ जनावरांसाठी – 37 हजार 500 ( 30 हजार), ओढकाम जनावरांसाठी – 32 हजार रुपये (25 हजार). वासरू, गाढव, खेचर आदीसाठी – 20 हजार रुपये (16 हजार रुपये). मेंढी, बकरी, डुक्कर यासाठी – 4 हजार रुपये (3 हजार). कुक्कूट पालन – 100 रुपये प्रति कोंबडी, दहा हजार रुपयांपर्यंत (50 रुपये प्रति कोंबडी, 5 हजार रुपयांपर्यंत).

शेती जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी – 8 हजार 500 रुपये, 2 हेक्टर मर्यादेत (6 हजार 800). आश्वासित सिंचनाखालील पिकांसाठी – 17 हजार रुपये प्रति हेक्टरी (13 हजार 500). बहुवार्षिक पिकांसाठी – 22 हजार 500 रुपये (18 हजार).

शेतजमीनीच्या नुकसानीसाठी – 18 हजार रुपये प्रति हेक्टरी (12 हजार 200 रुपये). दरड कोसळून किंवा जमीन खरडून झालेल्या नुकसानीसाठी – 47 हजार रुपये, प्रति हेक्टरी. (37 हजार 500)

मत्स्य व्यवसाय – बोटींच्या अंशतः दुरूस्तीसाठी – 6 हजार रुपये (4 हजार 100). अंशतः बाधित जाळ्यांच्या दुरूस्तीसाठी – 3 हजार रुपये ( 2 हजार 100). पूर्णतः नष्ट बोटीकरिता – 15 हजार रुपये (9 हजार 600). पूर्णतः नष्ट जाळ्यांसाठी – 4 हजार रुपये (2 हजार 600 रुपये).

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!