google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची बदली 

'यांनी' स्वीकारला पदभार 

                                   स्वराज न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा, मुंबई या पदावर निधी चौधरी यांच्या जागी झाली आहे. 
         डॉ. भोसले यांच्या जागी सिद्धराम सालीमठ यांची अहमदनगरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश नितीन गद्रे अपर मुख्य सचिव (सेवा) यांनी काढले आहेत.
           जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची ऑक्टोबर 2020 मध्ये सोलापूर जिल्हाधिकारीपदावरून नगर जिल्हाधिकारीपदावर बदली झाली होती. ते हजर झाल्यानंतर जिल्ह्यात कोविड संसर्गांत वाढ झाली होती. मात्र, या काळात डॉ. भोसले यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थिती उत्तम पध्दतीने हाताळली होती. त्यांच्या कोविडच्या कामाची दखल देशपातळीवर घेण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!