google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

अवैध गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा

६८ हजारांचा मुद्देमाल जप्त; नेवासा पोलिसांची कारवाई

                                     स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा शहरातील नाईकवाडी मोहल्ला परिसरात अवैधरित्या गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध नेवासा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे २०० किलो गोमांस व कातडीसह एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
         पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत नाईकवाडी मोहल्ला येथे काही व्यक्तींकडून अवैध गोमांस विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार नेवासा पोलिसांनी तातडीने पथक तयार करून मंगळवारी (दि. ३ जून) दुपारी साडेएकच्या सुमारास सलीम गणी शेख यांच्या घरावर छापा टाकला. 
             छाप्यादरम्यान घरात गोवंशाचे मांस कापून त्याची विक्री सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे २०० किलो गोमांस व कातडी जप्त केली. यावेळी जफर बिलाल चौधरी (वय ३५) आणि सलीम गणी शेख (वय ४५, दोघे रा. नाईकवाडी मोहल्ला, नेवासा) यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
         या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय कारभारी साठे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ कलम २७१ व ३२५ तसेच महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम कलम ५, ५(क), ९ व ९(अ) अंतर्गत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
           सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. कारवाईत सहाय्यक फौजदार नागरगोजे, पोहेकॉ अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल श्रीनाथ गवळी, अतुल शेळके, नारायण डमाळे, सलमान शेख तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर पडोळे यांनी सहभाग घेतला.
          या कारवाईमुळे परिसरात अवैध गोमांस विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!