google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

SSC, HSC परीक्षेसाठी दहा मिनिटे जास्त

शिक्षण मंडळाचा महत्त्वाचा निर्णय

                             स्वराज न्यूज नेटवर्क
पुणे : विद्यार्थी हित लक्षात घेऊन व पालक विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून दहावी बारावी बोर्ड परीक्षेत प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे परीक्षेसाठी वाढून मिळणार आहे.
          उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारित पूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते.
                इ. 10 वी व इ. 12 वीच्या परीक्षा विद्यार्थ्याच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत.
            अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात येत असल्याचे कळवण्यात आलेले होते.
        तथापि विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून देण्यात येत आहेत. फेब्रुवारी-मार्ग 2023 पासून सकाळी 11 वाजता व दुपार सत्रात दु. 3 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिका वितरण करण्यास, लेखनास प्रारंभ होईल. सकाळ सत्रात स. 10:30 वाजता तसेच दुपार सत्रात दु. 2:30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
उदा:–
परीक्षेची सध्याची वेळ – 11:00 ते दुपारी 2:00 वा.
परीक्षेची सुधारित वेळ – 11:00 ते दुपारी 2:10 वा.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!