google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

बाल धोरण व कृती आराखडा

हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन; 30 जूनपर्यंत मुदत

  1.                                      स्वराज न्यूज नेटवर्क 

मुंबई : महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल धोरणाचा प्रारुप मसुदा तयार करण्यासाठी गठित समितीने तयार केलेला मूळ मसुदा इंग्रजी भाषेत असून, मराठी भाषेमध्ये त्याचे भाषांतर करण्यात आले आहे.

   मसुदा शासनाच्या https://womenchild.maharashtra.gov.inhttps://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांकडून मसुद्यामध्ये शब्द रचना, व्याकरण या संदर्भाने हरकती व सूचना 30 जून रोजी सायंकाळी 6:15 वा. पर्यंत मागविण्यात आल्या असल्याची माहिती, महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.

              नागरिकांनी हरकती व सूचना महिला व बाल विकास आयुक्तालय, 28 राणीची बाग, जुन्या सर्किट हाऊस जवळ पुणे- 01 या पत्त्यावर अथवा childpolicy@gmail.com या ईमेल वर पाठवाव्यात. प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा 2022 मूळ इंग्रजी भाषेमध्ये तयार करण्यात आला असून त्याचे मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!