google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

क्रूझर आणि ट्रकची धडक; दोन ठार, तेरा जखमी

नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात 2 ठार, 13 जखमी; अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गावरील घटना

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात क्रूझर कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज सोमवार (दि. ९) सकाळी ५ वाजता घडला. क्रूझर चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला असून त्याच्याविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
            जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील केसरी स्पोर्ट्स अकादमीचे १३ मुले महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) क्रिकेट पाहण्यासाठी गहुंजे (पुणे) येथे गेले होते. बोदवडला परतत असताना पहाटे ५ वाजेच्या सुमारास अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला गावाच्या परिसरात क्रूझर ने (एमएच २० डीजे ४८३४) समोर उभ्या असलेल्या ट्रकला (एमएच ११ एएल ५११७) मागून धडक दिली. क्रूझर कारमध्ये प्रवास करणाऱ्या प्रथमेश योगेश तेली, वय १४ वर्षे, रा. बोदवड ता. बोदवड जिल्हा जळगाव या मुलाचा जागीच मृत्यू झाला. वृषभ बबन सोनवणे, वय १६ वर्षे (रा. बोदवड) या मुलास गंभीर दुखापत झाली. अहिल्यानगर येथील साईदिप हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. इतर ११ मुले आणि दोन प्रशिक्षकांवर नेवासा फाटा येथे उपचार सुरू आहेत.
                घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णवाहिकेद्वारे नेवासा फाटा येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
          क्रिकेट प्रशिक्षक फिर्यादी गौरव सुनील भोई यांनी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली की दि. 8 जून रोजी पहाटे 4 वा. चे सुमारास मी तसेच माझे सोबत प्रशिक्षक उज्ज्वल उर्फ भुषण सुभाष भोई, अक्षय संजय माळी वय 26 वर्षे, विद्यार्थी चिन्मय गजानन भोई वय 10 वर्षे, कुश योगेश घाटै वय 11 वर्षे, प्रदुम्न अनिकेत कुलकर्णी वय 10 वर्षे, आरव विजय शेळके वय 12 वर्षे, प्रतिक विठोबा धुमक वय 15 वर्षे, हर्षल भगवान महाजन वय 14 वर्षे, आगम धरमचंद खिवसरा वय 14 वर्षे, वंश ओमप्रकाश अग्रवाल वय 12 वर्षे, रोहन अंकित बेगाने वय 12 वर्षे, साई गुलाब जाट वय 15 वर्षे, उदय मोहन कोल्हे वय 14 वर्षे, प्रथमेश योगेश तेली वय 15 वर्षे, वृषभ बबन सोनवणे वय 16 वर्षे सर्व रा. बोदवड ता. बोदवड जिल्हा जळगाव असे आम्ही माझे ओळखीचा अविनाश उर्फ रोशन गोकुलसींग निकम रा. खामखेड ता. मलकापुर जिल्हा बुलढाणा याचे भाडोत्री कुझर चार चाकी वाहन क्र. एम.एच. 20 DJ 4834 मध्ये बसुन महाराष्ट्र प्रिमीयर लीगचे मँचेस पाहण्यासाठी जिल्हा पुणे येथे गेलो होतो.
             क्रिकेट मॅच संपल्यानंतर आम्ही आज दि. 9 जून रोजी रात्री गावी बोदवड येथे परत येण्यासाठी निघालो होतो. विद्यार्थ्यांना भुक लागल्याने आम्ही पुणेच्या बाहेर निघाल्यानंतर हॉटेलवर जेवण केले होते. हॉटेलचे नाव मला माहित नाही. वाहन चालक अविनाश उर्फ रोशन गोकुलसिंग निकम हा गाडी चालवत होता. पहाटे 5 वा. चे सुमारास आमची गाडी नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला गावाचे शिवारातील अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर हायवे रोडने जात असताना पुढे ट्रॉफिक थांबलेली होती. तरी सुध्दा आम्ही बसलेल्या गाडीतील चालकाने त्याचे ताब्यातील कुझर गाडी भरधाव वेगात पुढे नेण्याचा प्रयत्न करत असताना ट्रॉफिकमध्ये सगळ्यात पाठीमागे उभा असणारा ट्रक क्र. MH 11 AL 5117 चे चालक बाजुस पाठीमागे जोराची धडक देवुन ट्रक चालक बाजुने पुढे घासत गेल्याने रस्ता अपघात होवुन अपघातात कुझर गाडीचे मोठे नुकसान होवुन आम्हां सर्वांना कमी अधिक दुखापत झाली आहे. तेथील स्थानिक लोकांनी खाजगी अॅम्बुलन्स बोलावुन घेवुन उपचार करीता शिवसंगीता पाटिल हॉस्पीटल नेवासा फाटा ता. नेवासा येथे दाखल केले असता आमचेपैकी जखमी प्रथमेश योगेश तेली वय 14 वर्षे रा. बोदवड ता. बोदवड जिल्हा जळगाव हा उपचार दरम्यान मयत झाला आहे. तर वृषभ बबन सोनवणे वय 16 वर्षे यास पुढिल उपचार करीता अहिल्यानगर येथे पाठवुन दिले असता तो ही मयत झाला आहे.
                  तरी आज दि. 9 जून रोजी 5 वा. उस्थळ दुमाला ता. नेवासा गावाचे शिवारातील अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर हायवे रोडने घरी बोदवड, जिल्हा जालना येथे जात असताना आमचे क्रुझर चार चाकी वाहन क्र. एम.एच, 20 DJ 4834 वरील चालक अविनाश उर्फ रोशन गोकुलसिंग निकम रा. खामखेड ता. मलकापुर जिल्हा बुलढाणा याने त्याचे ताब्यातील नमुद वाहन हयगयीने अविचाराने रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवुन हायवे रोडवर समोर ट्रॅफिक मध्ये उभा असलेला ट्रक क्र. MH 11 AL 5117 चे चालक बाजुस पाठिमागे जोराची धडक देवुन ट्रक चालक बाजुने पुढे घासत जावुन रस्ता अपघात घडला आहे.
        नेवासा पोलिसांनी  क्रुझर चालक आरोपी अविनाश उर्फ रोशन गोकुळसिंग निकम यास ताब्यात घेतलेले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे हे करीत आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!