google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

अखेर नेवाशाला मिळाल्या पाच ‘लालपरी’!

नेवासकरांचा नेवासा-पुणे प्रवास सुखकर होणार; बऱ्याच दिवसांची मागणी पूर्ण 

                                      स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : गेल्या मे महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुक्यांच्या बस डेपोमध्ये ५० नवीन लालपरी आल्या होत्या. परंतु नेवासा बस डेपोला नवीन बस न मिळाल्याने नेवासा येथील प्रवासी तसेच बस चालक वाहक नाराज झाले होते. डेपोच्या अनेक बसेस नादुरुस्त होत होत्या. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. परंतु काल नेवासा डेपोमध्ये पाच नवीन लालपरींचे आगमन झाले आणि आज आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
               गेल्या आर्थिक वर्षात नेवासा बस डेपोने ५१ लाख रुपयांचा नफा कमावला होता. परंतु जेव्हा नवीन वाहने पुरवण्याचा प्रश्न आला तेव्हा नेवासा बस डेपोला अंगठा दाखवण्यात आला होता. अखेर आज, शुक्रवार, दि. ६ जून रोजी, आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते नेवासा डेपोमध्ये पाच नवीन बसेसचे विधिवत पुजन करून आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

 

             यावेळी प्रमुख उपस्थिती पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर शिंदे, तहसीलदार संजय बिरादार, आगार प्रमुख प्रशांत होले, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष अँड. सादिक शिलेदार, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, शिवसेना विधानसभा प्रमुख भाऊसाहेब वाघ, भाजप युवा नेते ऋषिकेश शेटे, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, भाजप तालुकाध्यक्ष प्रताप चिंधे, नेवासा शहराध्यक्ष मनोज पारखे, निरंजन डहाळे, शंकरराव लोखंडे, आदिनाथ पटारे, राजेंद्र मुथा, सुनील वाघ, सतीश गायके, डॉ. करणसिंग घुले, श्रीकांत नळकांडे, किरण जाधव, ॲड भाऊसाहेब करडक, श्री सुनील हारदे, अजय डौले, भास्कर कनगरे, सतीश क्षीरसागर, बाळासाहेब पिसाळ आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

             तालुक्यामध्ये नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर, देवगड येथील दत्त मंदिर, शनि शिंगणापूर तीर्थक्षेत्र आहे. शिर्डीला जाणारे साई भक्तही नेवासा येथूनच मार्गक्रमण करतात. गेल्या अनेक वर्षांपासून नेवासा बस डेपोमध्ये एकही नवीन बस दाखल झालेली नाही, त्यामुळे डेपोमध्ये नवीन बसेसची सोय करणे आवश्यक होते.
नेवासा बस डेपोमध्ये पाच लालपरी बस दाखल झाल्या आहेत. सध्या नगर-पुणे मार्गावर सहा बसेस फेरी करतात. या पाचही नवीन लालपरी बस नगर-पुणे महामार्गावर धावणार आहेत. प्रवाशांनी या सुखकर प्रवासाचा लाभ घ्यावा. प्रशांत होले आगार प्रमुख नेवासा
नेवासा बस डेपोमध्ये पाच नवीन लालपरी बसेस आल्याने प्रवाशांच्या अडचणी कमी होतील. आधुनिक बसेसमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांमुळे प्रवास सुखकर होईल. -सूरज वाघमारे, नेवासा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!