स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा फाटा ते भानसहिवरा रस्त्यावर ऊसाने भरलेल्या भरधाव ट्रकने मोटारसायकलला पाठीमागुन जोराची धडक दिल्याने देडगाव येथील महिला जागीच ठार झाली. ही घटना आज सोमवार (दि.6) रोजी दुपारच्या सुमारास घडली.
याबाबत माहीती अशी की, मोटारसायकलवरून मुंगसे पती पत्नी हॉस्पिटलचे काम आटोपून देडगा असतांना नेवासा फाटा ते भानसहिवरा रोडवरील हंडिनिमगाव शिवारात त्यांच्या मोटारसायकलला भरधाव ऊसाने भरलेल्या ट्रकने पाठीमागुन जोराची धडक दिली.
या अपघातात लंकाबाई मुंगसे ह्या रोडवर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सखाहारी पांडुरंग मुंगसे (वय 60 रा. देडगाव) यांनी नेवासा पोलीस स्टेशनला ट्रक चालकाविरूद्ध फिर्याद दाखल केली.