google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

देश-विदेश

शनि शिंगणापूरमध्ये देशभरातील भाविकांचा महापूर

लाखो भाविक शनि चरणी लीन; मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतले शनिदर्शन; भाविकांद्वारे लंगरचे आयोजन 

                            स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी देश, विदेशातील तसेच राज्यातील विविध भागातील शनी भक्त मोठ्या संख्येने गेल्या दोन दिवसांत शनि शिंगणापुरात दाखल झाले.  नाताळच्या सुट्ट्या तसेच शनिवार, रविवार असल्याने देशभरातील प्रत्येक भागातून शनी दर्शनासाठी गेल्या दोन दिवसांत दोन लाखांहून अधिक संख्येने भाविकांनी दर्शन घेतले. दरम्यान आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान देखील शनि चरणी लीन झाले.
  

       मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी शिर्डी येथे साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. शिवराज सिंह चव्हाण हे दरवर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला कुटुंबासह साई समाधीचे दर्शन घेतात. दरवर्षी 31 डिसेंबरला साई चरणी तर एक जानेवारीला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान शनिशिंगणापूरला शनीदर्शनास येतात. आज सव्वाचारच्या दरम्यान मंदिर परिसरात येऊन त्यांनी पूजा अर्चना केली. त्याचबरोबर शनि देवाच्या मूर्तीस तेलाचा अभिषेकही केला. 

           भाविकांनी मानलेल्या श्रद्धास्थानासमोर नतमस्तक होऊन नवीन वर्षाच्या प्रारंभी पहिल्या दिवशी जल्लोषात स्वागत केले. मंदिर परिसरात शनिवारी भाविकांची संख्या खूप वाढलेली होती. जी रविवारी रात्री उशिरापर्यंत कायम होती. शनी मंदिराचे प्रवेशद्वार मंदिर परिसर शनी चौधरी गेली होती तसेच आकर्षक फुलांनी हे सजावट केलेली होती. शनि भक्तांनी यावेळी लंगरचे आयोजन केले होते त्याचा अन्य शनि भक्तांनी लाभ घेतला

         नवीन वर्षाच्या स्वागताहेतू होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने ही चोख बंदोबस्त ठेवला होता. यादरम्यान राज्याच्या विविध भागातून आलेले शनि भक्त शनिचे दर्शन करत होते. दर्शनासाठी मोठ मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. परिसरातील सर्वच हॉटेल हाउसफुल झालेले होते. शनी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवण्यात आली होती.
          मंदिर परिसरात कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त बोलवण्यात आला होता. ज्यामध्ये पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे, शनिशिंगणापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, शेवगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, नगरचे पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय गायकवाड, शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे कंपनी चालक अजय ठुबे, बाबासाहेब वाघमोडे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!