google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवाशातील विशेष शिबिरास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

पुनर्वसन जमिनींचे 'वर्ग-२' मधून 'वर्ग-१' मध्ये रूपांतर; शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे प्रशासनाचे आवाहन 

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तहसील कार्यालयात पुनर्वसन जमिनींचे ‘भोगवटादार वर्ग-२’ मधून ‘भोगवटादार वर्ग-१’ मध्ये रूपांतर करण्यासाठी आयोजित विशेष शिबिरास पहिल्या दिवशी १३८ शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रशासनाची ५०० अर्जांची तयारी असून, हे विशेष शिबिर रविवार ( दि.२५ जानेवारी) रोजी सुरू राहणार आहे. तरी तालुक्यातील संबंधित शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
           पुनर्वसन अंतर्गत मिळालेल्या जमिनी ‘भोगवटादार वर्ग-२’ मधून ‘वर्ग-१’ मध्ये रूपांतरित करणे, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जागेवरच सोडवणे व महसूल वसुलीस गती देणे या उद्देशाने नेवासा उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील व तहसीलदार संजय बिरादार यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
           शासकीय प्रक्रियेतील क्लिष्टता कमी करून शेतकऱ्यांना जलद सेवा देण्यासाठी प्रशासनाने ही विशेष मोहीम आखली आहे. आज पहिल्या दिवशी १३८ अर्जदारांनी आपल्या जमिनीच्या वर्ग बदलासाठी सहभाग नोंदवला. या शिबिरासाठी तहसील कार्यालयात एकाच वेळी ५०० अर्जदारांचे काम हाताळता येईल, अशी सक्षम यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
 “शासकीय नियमांनुसार जमिनीचा वर्ग बदलण्याची प्रक्रिया सुलभ व जलद करण्यासाठी हे शिबिर आयोजित केले आहे. जे शेतकरी आज येऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी रविवारीही शिबिर सुरू राहणार आहे. तरी पुनर्वसन जमिनीधारक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयात उपस्थित राहून या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा.”  – सुधीर पाटील, उपविभागीय अधिकारी.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!