google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

श्रीमोहिनीराज देवस्थानात दगडी शिल्प व्यासपीठाचे लोकार्पण

नेवासा येथील श्रीमोहिनीराज देवस्थान

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 

नेवासा : येथील ग्रामदैवत श्री.मोहिनीराज देवस्थानमध्ये बसविण्यात आलेल्या दगडी शिल्प नूतन व्यासपीठाचे लोकार्पण शुक्रवार (दि.२३) माघ शुध्द पंचमीच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे महंत हभप देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री व लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांच्या हस्ते व भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आले. 
       नेवासा येथील श्री. मोहिनीराज देवस्थानात बसविण्यात आलेले नूतन व्यासपीठ हे दगडी असून भक्ती व कलाकौशल्याचा जिवंत संगम ठरले आहे. आठ फूट रुंद चार फूट रुंद व चार फूट उंचीचे हे दगडी महिरप असलेले हे व्यासपीठ नांदेड येथील अत्यंत कुशल कारागिरांनी आपल्या कलात्मक हातांनी साकारले असून त्यावर कोरलेल्या नाजूक व भावपूर्ण डिझाईन मंदिराच्या गाभाऱ्याला वेगळीच शोभा देत आहेत.
            यावेळी झालेल्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान विश्वस्त रामभाऊ जगताप, श्री मोहिनीराज न्यासचे अध्यक्ष रविंद्र जोशी,जयंत देवचक्के,  श्री मोहिनीराज मंदिर देवस्थानचे सचिव जयेश बडवे, डॉ. उदयकुमार बल्लाळ, नगरसेवक स्वप्नील मापारी, निरंजन डहाळे, राजेंद्र गुजराथी, महेश मापारी, संजय देशपांडे, प्रमोद देशपांडे, प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे दिपक गोसावी, पी.के.देशपांडे, शंकरराव बडवे, विश्वनाथ बडवे, अनंत बडवे, नारायण बडवे, भरत बडवे, श्रीपाद बडवे, सुदर्शन बडवे, जितेंद्र डहाळे यांच्यासह भाविक उपस्थित होते.
              सदरचे व्यासपीठ हे संत महंतांसाठी व आध्यत्मिक प्रबोधनाच्या महत्वाचे असल्याने या व्यासपीठाचे वेदमंत्राच्या जयघोषात पूजन करण्यात आले.यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न ग्रामपुरोहित विष्णुपंत बडवे, नारायण बडवे, अनंत बडवे यांनी केले. वेदांताचार्य हभप देविदास महाराज म्हस्के शास्त्री यांनी व्यासपीठ लोकार्पण प्रसंगी शुभाशीर्वाद दिले. भगवान विष्णूंचे स्त्रीरूप दर्शन जगाच्या पाठीवर येथेच झाले आहे, ही भूमीच पुण्यवान अशी आहे म्हणूनच भगवंताचा स्पर्श येथे झाला आहे असे सांगून त्यांनी पुण्यभूमीचे महिमा अगाध असल्याचे सांगितले.
               यावेळी बोलतांना नगराध्यक्ष डॉ. घुले म्हणाले की नव्याने बसविण्यात आलेल्या व्यासपीठासमोर वर्षभर धार्मिक कार्यक्रम चालतात. याच व्यासपीठावरून धर्म प्रबोधनासह पोथी पुराण कथेचा ही कार्यक्रम होतो. चांगल्या कार्यक्रमासाठी आम्ही देखील योगदान देत राहू असे स्पष्ट केले. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. जयेश बडवे यांनी उपस्थित मान्यवर व भाविकांचे आभार मानले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!