google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

आज मध्यरात्रीपासून वीज कर्मचारी संपावर!

खाजगीकरणाच्या विरोधातील तीन दिवसीय संप; अभियंता व कर्मचारी सहभागी होणार

                            स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : महावितरणच्या खाजगीकरणाच्या विरोधात दि. 4, 5, 6 जानेवारी रोजी पुकारलेल्या तीन दिवसीय संपात नेवासा तालुक्यातील 18 अभियंता व सद्य सेवेत कार्यरत व इतर कंत्राटी असे 250 कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती नेवासा येथील महावितरणचे सहायक अभियंता व अहमदनगर सर्कल अध्यक्ष एस.इ. ए.चे माजी अध्यक्ष मनोहर पाटील यांनी दिली.
    
           प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मंगळवारी रात्री 12 वाजल्यापासून महावितरणच्या खाजगीकरणाविरुद्ध 3 दिवसांचा (4,5,6 जानेवारी) संप पुकारण्यात आला आहे. या संपामध्ये सर्व संघटना सहभागी होणार आहे. यासाठी सर्व ग्राहकांना विनंती आहे की, आपली विजेशी संलग्न महत्त्वाची कामे रात्री 12 पर्यंत करून घ्यावीत, जसे- मोबाईल, इन्व्हर्टर चार्ज करणे, पाण्याच्या टाक्या भरून घेणे इ.
         
         हा संप आमच्या कुठल्याही आर्थिक मागण्यांसाठी नसून जर खाजगीकरण झाल्यास ग्राहकांना खाजगी कंपनीच्या मनमानी दराने वीज विकत घ्यावी लागेल आणि ग्रामीण भागातील शेतकरी तसेच घरगुती ग्राहक यांना मिळणारी सबसिडी पण बंद होईल. या तीन दिवस होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.  पण आम्हाला समजून घ्या आणि सर्वांनी सहकार्य करा अशी कळकळीची विनंती प्रसिद्धी पत्रकात करण्यात आली आहे.

खाजगीकरणाच्या विरोधात महावितरणने पुकारलेला तीन दिवसांचा संप हा संपूर्ण राज्यात असल्याने यात जनरेशन, पारेषण व महावितरण असे एकूण एक लाख अभियंता व कर्मचारी सहभागी होणार आहेत. -मनोहर पाटील सहायक अभियंता, नेवासा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!