google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

प्रवरासंगम येथील गोदावरीतीरी अजितदादांच्या अस्थिंचे विसर्जन!

सहकार चळवळीचे मोठे नुकसान; मा. आ.चंद्रशेखर घुले पाटील!

                                      स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या बारामतीहून आलेल्या अस्थींचे पूजन करून अहिल्यानगर जिल्ह्याच्यावतीने सोमवार (दि.2) रोजी सायंकाळी 5 वाजता प्रवरासंगम येथील गोदावरीतीरी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विसर्जन करण्यात आले.
             अस्थी विसर्जनाप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, राजेंद्र नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, सत्यजित कदम, अब्दुलभैया शेख, संजय कोळगे, ताहेर पटेल, राष्ट्रवादी काँगेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, संभाकाका पवार, दादा गंडाळ, अशोक मिसळ, बाळासाहेब नवले, शिवाजी कोलते, भाऊसाहेब कांगुणे, भाऊसाहेब सावंत, गणेश गव्हाणे, जगन्नाथ कोरडे, विलास देशमुख, कामगार तलाठी ऐश्वर्या देशमुख, बी.के. चव्हाण, योगेश रासने, जेष्ठ पत्रकार राजेंद्र वाघमारे, नगरसेवक प्रवीण सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
           राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थी सायंकाळी 5 वाजता प्रवरासंगम येथील गोदावरीतीरी आणण्यात आल्या. यावेळी पुरोहित्य घनश्याम रसाळ, ऋषिकेश जोशी यांनी वेदमंत्राच्या जयघोषात अस्थिंचे यावेळी पूजन केले.
         यावेळी बोलतांना जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील म्हणाले की,राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी शोक व्यक्त करत मोठी हळहळ व्यक्त केलेली आहे दादांच्या निधनाने सहकार चळवळीचे मोठे नुकसान झालेले असून दादांनी दिलेला ‘वादा’ संपूर्ण राज्याला माहित असून शब्दाला पक्का असणारा हा नेता आणि प्रशासनावर  मजबूत पकड ठेवणाऱ्या अशा या नेत्याला अकाली जाण्याने श्रद्धांजली वाहण्याची दुर्दैवी वेळ आली हेच खरे दुर्भाग्य असल्याचे सांगून जिल्हा सहकारी बँक, ज्ञानेश्वर उद्योग समूह आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने त्यांनी यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
        यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, राजेंद्र नागवडे, अब्दुलभैया शेख यांनी स्व.अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने शोक व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बाबा कांगुणे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक मोरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!