google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा

मानधन व प्रोत्साहन भत्त्यापोटी १७८.७२ कोटी

                     स्वराज न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे डिसेंबर महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने मानधन व प्रोत्साहन भत्त्यापोटी १७८.७२ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.
         अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर २०२५ या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी एकूण १७८.७२ कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. २०२५-२६ सालासाठी २१०९.७२ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. यापूर्वी १४८७.३८ कोटी रूपये वितरीत करण्यात आलेले आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!