google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

सराईत गुन्हेगारांकडुन सहा मोटारसायकली हस्तगत

नेवासा पोलिसांची कारवाई; 14 मोटारसायकली चोरल्याची आरोपींची कबुली; मोटारसायकल चोर नेवासा तालुक्यातील

                              स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : गुप्त बातमीदाराद्वारे मिळालेल्या माहितीवरून नेवासा पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये दोन आरोपींसह सहा मोटरसायकल हस्तगत करण्यात नेवासा पोलिसांना यश मिळालेले आहे. दरम्यान, आरोपींनी 14 मोटारसायकली चोरल्याची कबुली पोलिसांना  दिली आहे.
           
           या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नेवासा पोलीस स्टेशन गुरनं 54/2023 भादंवि कलम 379 मधील फिर्यादी किशोक बहिरुनाथ कोकणे (वय 20 वर्षे रा नेवासा बु. ता नेवासा जि अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस स्टेशनला मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हाचा तपास करता असतांना पोलीस निरीक्षक विजय करे यांना शनिवार (दि.21) रात्री 8:30 वाजता गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा अनिल रावसाहेब बर्वे रा गेवराई ता नेवासा जि अहमदनगर याने केले केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथक रवाना करण्यात आले होते.
               सदर पोलीस पथकाने गेवराई ता नेवासा जि अहमदनगर येथे जावून सदर आरोपीस ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्हा संदर्भाने चौकशी केली असता त्याने सदर गुन्हयातील मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली. गुन्हा करते वेळी त्याचेबरोबर साजिद परवेज ऊर्फ पप्पु पठाण (रा खडका फाटा ता नेवासा) हा असल्याचे समजल्याने वरील आरोपींना ताब्यात घेवून त्यांना पोलिसी खाक्या दाखविला असता त्यांनी 14 मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. आरोपी यांचेकडून सहा मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या असून त्यामध्ये बजाज प्लॅटीना, होंडा अॅव्हिटर, प्लेझर हिरो होन्डा, टीव्हीएस स्टार प्रत्येकी एक तर  दोन बजाज बॉक्सर मिळून आल्या आहेत. उर्वरीत मोटारसायकली तपासादरम्यान हस्तगत होण्याचा आशावाद पोलीस निरीक्षक विजय करे यांनी व्यक्त केला. 
           सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विजय करे, पोसई समाधान भाटेवाल, सफौ बाळकृष्ण ठोंबरे, पोना राहुल यादव, पोना संजय माने, पोकॉ गणेश इथापे, पोकॉ शाम गुंजाळ, पोकॉ अंबादास गिते व होमगार्ड प्रवीण वाल्हेकर यांनी केली असून पुढील तपास सफौ बाळकृष्ण ठोंबरे हे करीत आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!