ब्रेकिंगमहाराष्ट्र
ज्येष्ठ नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

स्वराज न्यूज नेटवर्क
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शारीरिक दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने व उपकरणे खरेदीसाठी तीन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. यात चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॅड, स्टीकव्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वायकल कॉलर आदींचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी केले आहे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
१) आधारकार्ड / मतदानकार्ड
२) राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स
३) पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
४) स्वयंघोषणापत्र
५) जातीचे प्रमाणपत्र
६) वयाची ६५ वर्षे पूर्ण असणे आवश्यक (३१/१२/२०२३ अखेरपर्यंत)
७) घरातील उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र
८) मागील ३ वर्षात कोणत्याही सरकारी स्तोत्राकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे याबाबत लाभार्थी घोषणापत्र
या योजनेचा अर्जासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सावेडी नाका, अहमदनगर येथे संपर्क साधावा. असे ही देवढे यांनी पत्रकात नमूद केले आहे