स्वराज न्यूज नेटवर्क
अहमदनगर: कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील संजयनगर काटवन खंडोबा व बुरुडगाव रोड परिसरात राहणारे व शहरात चो-या करून हत्यारे बाळगून करुन दहशत निर्माण करणारे विकास दिलीप खरपुडे (वय २५ वर्ष, रा बुरुडगाव रोड, अहमदनगर), सुनिलसिंग जितसींग जुन्नी (वय २६ वर्ष, रा काटवन खंडोबा संजयनगर, अहमदनगर) यांचा हद्दपारीचा प्रस्ताव कोतवाली पोलीस स्टेशनकडुन दाखल करण्यात आला होता.
उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांनी सदर हद्दपार प्रस्तावांची चौकशी करून दोन्ही आरोपींना हद्दपार करण्याबाबत शिफारस केली होती त्यावरून सुनावणी घेऊन उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग, अहमदनगरचे श्रीनिवास अर्जुन यांनी सदर गुन्हेगारांना अहमदनगर जिल्ह्यातुन २ वर्षाकरीता हद्दपारीचे आदेश पारित केले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे आदेशान्वये गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी तात्काळ सदर आरोपीना ताब्यात घेवुन त्याच्यावर आज दि २० रोजी हद्दपारीची कारवाई केली आहे. सदर हद्दपार इसमावर या पुर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
विकास दिलीप खरपुडे
कोतवाली पोस्टे गुरनं ४७/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे, गुरनं ४८/२०२२ भादवि ३७९ प्रमाणे, गुरनं ८७२ / २०२१ भादवि ३७९ प्रमाणे, गुरनं ६६ / २०२० भादवि १६० प्रमाणे, तोफखाना पोस्टे गुरनं १५३/२०२२ भादवि ३७९ प्रमाणे, शेवगाव पोस्टे गुरनं ९२ / २०२१ आर्म अॅक्ट ३/२५, ७/२५ महा पोकाक १२४
सुनीलसिंग जितसिंग जुन्नी
कोतवाली पोस्टे गुरनं ५०१/२०१७ भादवि ३७९, ३४ प्रमाणे, गुरनं ६८७/२०२१ भादवि ३५४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे, गुरनं १९२ / २०२२ भादवि ३९९, ४०२ सह आर्म अॅक्ट ३/२५, ४/२७, ७ प्रमाणे, MIDC पोस्टे नगर गुरनं ३८२/२०१८ भादवि ३९९, ४०२ सह आर्म अॅक्ट ४/२५
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. चंद्रशेखर यादव पोलीस कर्मचारी तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, मुकुंद दुधाळ, कविता गडाख, ए पी इनामदार, पोकॉ सोमनाथ राऊत, पोकॉ अमोल गाढे, पोकॉ सुजय हिवाळे, पोकॉ सागर मिसाळ, पोकॉ अतुल काजळे, अभय कदम, राहुल मासाळकर यांच्या पथकाने केली आहे