google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजन

महात्मा फुले बालसंगोपन केंद्रात संविधान दिन साजरा

घोडेगाव येथील अनाथ, निराधार, दलित, आदिवासी भटक्या विमुक्त व शिक्षणापासून वंचित मुलांसाठीचे केंद्र

                            स्वराज न्यूज नेटवर्क 
घोडेगाव : येथील महात्मा फुले बालसंगोपन केंद्र येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान दिन साजरा करण्यात आला.
             
             श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा फुले बालसंगोपन केंद्र घोडेगाव. ता. नेवासा. जि. अहमदनगर अंतर्गत सुरू असलेल्या अनाथ, निराधार, दलित, आदिवासी भटक्या विमुक्त व शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांची सेवा केली जाते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी राज्यघटनेचे महत्त्व विशद करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन परिचय उपस्थितांना दिला.
         
          यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन ज्ञानेश्वर पा. सोनवणे, बाळासाहेब पा.लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल पा सोनवणे, व्यापारी अमर भई शेख, जि प प्रा शाळा शालेय समिती अध्यक्ष सुनील आल्हाट, सामाजिक कार्यकर्ते जावेद भाई इनामदार, उद्योजक विजय सोनवणे, राजेंद्र सोनवणे, रमेश हनवत, अमोल पवार, मंगेश वैरागर आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष काशिनाथ चौगुले यांनी केले. अधीक्षक संजू शेगर यांनी आभार व्यक्त केले. सहशिक्षिका मंगल पिसे, मदतनीस सुनिता ठोंबरे यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!