गुन्हेगारी
पानेगांव ग्रामस्थांनी केला सोनई पोलिसांचा सन्मान
हॉटेल तोडफोडीचे आरोपी दोन तासात केले जेरबंद

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : पानेगांव ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा वतीने सोनई पोलीस ठाण्यात जावून अधिकारी कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. पानेगांव (ता. नेवासे) येथे दि.१८ रोजी येथील हाॅटेल आमराई परमीट रुममध्ये घुसून तोडफोड करुन दारुच्या बाटल्या तसेच पैसे लुटण्याची गंभीर घटना सराईत गुन्हेगारांनी केली होती. या घटनेचे पडसाद पानेगांव तसेच करजगांव व परिसरात बंदची हाक देवून गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी. येथे परीसरात वाढत चाललेली गुन्हेगारी वाळू तस्करी, अवैध धंद्यावर चाप बसावा, महाविद्यालय विद्यार्थ्यांनी टारगटाकडून होणारा त्रास यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी बंद करण्यात आला होता.
हाॅटेल तोडफोडीचे गांभीर्य ओळखून सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि विजयकुमार माळी, उपनिरीक्षक सुरज मेढे, पोलीस नाईक बाळासाहेब तागड, हेडकॉन्स्टेबल गोरक्षनाथ जावळे, वजीर शेख आदी फौज फाट्यासह दाखल होवून सपोनि माळी यांनी घडलेला प्रकार हा अतिशय गंभीर ओळखून तातडीने तपासाचे चक्र फिरविले. आरोपींचा मोबाईल लोकेशन तपासून आरोपी जवळच्या गावात असल्याचे लोकेशन कळताच आरोपींचा मागावर सपोनि माळी, उपनिरीक्षक मेढेसह कर्मचारी यांनी चित्रपटात शोभेल असा चित्तथरारक प्रसंग ऊसाच्या शेतात पाठलाग करुन अखेर आरोपी दोन तासात जेरबंद करण्यात आले.
आरोपींना बघण्यासाठी एकच गर्दी झाली होती. गर्दी दाद देत पोलीसी खाक्या काय असतो हे जनतेला यानिमित्ताने कळले. सोनई पोलीसांचा टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले होते. या निमित्ताने मुळाचे संचालक मा लोकनियुक्त सरपंच संजय जंगले, किशोर जंगले, अमित जंगले, संदिप जंगले, सुरज जंगले आदी उपस्थित होते.
सोनई पोलीस ठाण्यात कार्यरत होवून दोन महिन्यांचा कालावधी येथील २८ गांव तसेच मुळाथडी परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांची माहिती घेत असून जनतेसाठी तप्तर असून गुन्हेगारांची तसेच कायदा हातात घेणाऱ्यांची गय करणार नाही – स.पो.नि विजयकुमार माळी सोनई पोलीस स्टेशन.
सोनई पोलीस ठाण्यात जनार्दन सोनवणे, रामचंद्र कर्पे, माणिक चौधरी, आशिष शेळके यांसारखे स.पो.नि. विजय माळी व उपनिरीक्षक सुरज मेढे दोन्ही खमके अधिकारी लाभले असून जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे ,शेवगाव उपविभागीय पोलिस उपअधीक्षक सुनिल पाटील यांना भेटून पानेगांव करजगांव परिसरात पोलीस दूरक्षेत्र करावे अशी मागणी करणार – दत्तात्रय पाटील घोलप, उपसरपंच पानेगांव.