google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

शितल झरेकर यांना ‘नॅशनल टीचर इनोव्हेशन अवॉर्ड’

सर फाऊंडेशनद्वारे दिला जाणार पुरस्कार; प्रवरासंगम जिप प्राथमिक शाळेच्या शिक्षिका शितल झरेकर

                            स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रवरासंगम येथील उपक्रमशील शिक्षिका शितल झरेकर-आठरे यांना स्टेट इनोव्हेशन ॲण्ड रिसर्च फाऊंडेशन (सर फाऊंडेशन), महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ‘नॅशनल टीचर इनोव्हेशन अवॉर्ड 2022’ नुकताच जाहीर झाला आहे.
                  
             सर फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा 2022 आयोजित केली होती. यामध्ये देशभरातून महाराष्ट्र राज्यासह आठ राज्यातील  प्राथमिक, माध्यमिक तसेच क्षेत्रीय अधिकारी यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये उपक्रमशील शिक्षिका शितल झरेकर यांच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी, मुलींचे शिक्षणाबद्दल पालक जनजागृती तसेच शंभर टक्के पट नोंदणी व उपस्थिती  यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी नवगतांचे स्वागत, प्रवेशोत्सव व्हावा यासाठीचा ‘प्रवेशोत्सवाचा सेल्फी पॉईंट’ या नवोपक्रमाची निवड झाली आहे.
                       
            ‘नवोन्मेष’ या प्रकल्पांतर्गत हे अवॉर्ड जाहीर करण्यात आले असून शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर तज्ञ समितीद्वारे ही निवड केली असल्याचे राज्य समन्वयक सिद्धराम माशाळे, बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे आदींनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. हा पुरस्कार वितरण शास्त्रज्ञ, विविध शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, अधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष एज्युकेशन कॉन्फरन्स मध्ये येत्या मार्च महिन्यात होणार आहे.
                   
            शिक्षिका शितल झरेकर यांच्या प्रवेशोत्सवाचा सेल्फी पॉईंट हा उपक्रम केंद्र सरकारच्या शगुन पोर्टलवर यापूर्वी प्रसिद्ध झाला असून राज्यातील विविध शाळांमध्ये यशस्वीपणे राबवला आहे.शासनाच्या माहे जुलै व सप्टेंबर 2021 च्या जीवन शिक्षण अंकात याविषयी विस्तृत लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या आनंददायी कृतीयुक्त शिक्षणाच्या उपक्रमांच्या व्हिडिओची दखल समग्र शिक्षा अभियान घेतली असून यापूर्वी एस सी आर टी च्या शिकू आनंदे कार्यक्रमात सुलभक म्हणून काम केले आहे.
                  
              प्राथमिक शिक्षिका झरेकर यशाबद्दल शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी जयश्री कार्ले, विलास साठे, मा सभापती सुनीताताई गडाख, रावसाहेब कांगुणे, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, केंद्रप्रमुख संतोष ढोले, प्रवरासंगमच्या सरपंच अर्चना सुडके व सर्व सदस्य, फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक शोभा कोकाटे, दत्तात्रय शिंदे, शिवनाथ भुजबळ, मुख्याध्यापक जोसेफ मकासरे व सर्व शिक्षक वृंद, ग्रामस्थ, पालक आदींनी अभिनंदन केले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!