google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार; क्रीडा व युवक सेवा, सहसंचालक यांचे आवाहन

                               स्वराज न्यूज नेटवर्क 
नाशिक : क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारांतर्गत २०१९- २०, २०२०-२१ व २०२१-२२ च्या पुरस्कारांसाठी  फेडरेशन कप स्पर्धेत सहभागी, प्राविण्यप्राप्त खेळाडूंनी ३१ मार्चपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन सहसंचालक क्रीडा व युवक सेवा चंद्रकांत कांबळे यांनी केले आहे. 
       
           फेडरेशन कप स्पर्धांचे गुणांकन होत नसल्यामुळे काही खेळाडू शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०१९- २०, २०२०-२१ व २०२१-२२ या तीन वर्षाकरीता अर्ज सादर करू शकले नाहीत. यासाठी अशा खेळाडूंचे नुकसान होऊ नये व खेळाडू पुरस्कारापासून वंचित राहू नये, यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
             इच्छुक खेळाडूंनी त्यांचे प्रस्ताव व विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे सादर करावेत. पुरस्कारासाठीचे अर्ज आणि माहिती क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती क्रीडा विभागाने दिली आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!