google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजन

सेंट मेरीज स्कूलचे स्नेहसंमेलन संपन्न

बाल कलाकारांनी जिंकली मने; आकर्षक वेशभूषेत विद्यार्थ्यांचा सहभाग 

                                      स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : अहिल्यानगर येथील सेंट मेरीज स्कूलचे स्नेहसंमेलन शुक्रवार (दि.20) रोजी संध्याकाळी उत्साहात पार पडले. यावेळी बाल विद्यार्थ्यांनी एकाहून एक अशा सरस सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित प्रमुख पाहुणे व पालकांची मने जिंकून घेतली.
            वार्षिक स्नेहसंमेलनाची थीम ‘वन नेशन वन ड्रीम’ होती. विद्यार्थ्यांनी समूह स्वरूपात या थीमशी केंद्रित विविध देशातील नृत्य प्रकारांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी यावेळी प्रार्थना गीते, स्वागत गीते, स्पॅनिश नृत्य, फ्रेंच नृत्य, आफ्रिकन नृत्य, नेपाळी नृत्य, मेक्सिकन नृत्य, ख्रिसमस नृत्य, भारतीय पारंपारिक नृत्य, नाटिका असे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. यावेळी रतन टाटा यांनी भारतीय अर्थव्यवस्थेस दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल एक विशेष सांत्वनापर गीत सादर करण्यात आले.
               
             कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्याम शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण व अँड. मनोज दौंड उपस्थित होते. प्रमुख पाहुणे डॉ. श्याम शिंदे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून सांस्कृतिक कार्यक्रमाने विद्यार्थ्यांची जडणघडण होत असल्याचे विविध उदाहरणांनी स्पष्ट केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जोसी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सिस्टर मारिया यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली कालाणे व वैशाली साळवे यांनी केले.
           या कार्यक्रम प्रसंगी विजय लोंढे, संदीप सरोदे, विष्णु खांदोडे, प्रशांत गायकवाड, सुरेश लव्हाटे, पापा शेख, सकीना शेख, सना शेख, योगिनी बनगर, शबाना शेख, सुशीला लोंढे, रेश्मा लोखंडे, मुबिना शेख, वैशाली ससाणे, संगीता पातारे, अनिता मारकळी, लिया थोरात यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. मुबिना शेख यांनी आभार व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!